Ayushmann Khurrana Birthday: रिजेक्शननंतर ट्रेनमध्ये ढसाढसा रडला होता आयुष्मान, शेअर केला तो किस्सा...

ayushmann khurrana
ayushmann khurranaEsakal

आज आयुष्मान खुरानाचा वाढदिवस. असे काही अभिनेते असतात ज्यांना यश मिळायला खुप काळ जावा लागतो. पण जेव्हा हे यश मिळतं तेव्हा ते सोन्यासारखं चमकून उठतं.

असाच अभिनेता म्हणजे आयुष्मान खुराना. आधी रोडीज, नंतर RJ मग पुढे अभिनेता म्हणुन आयुष्मानने त्याच्या करियरमध्ये यशस्वी पाऊल ठेवलं. आज आयुष्मानच्या वाढदिवसानिमित्त जाणुन घेऊ त्याच्या आयुष्यातला एक किस्सा

(Ayushmann Khurrana Birthday)

आयुष्मान खुराना आणि जयदीप अहलावत हो दोघ 'अ‍ॅन ॲक्शन हिरो' हा चित्रपट 2 डिसेंबरला थिएटरमध्ये झाला. आयुष्मान खुराना आणि जयदीप अहलावत त्यांच्या 'अ‍ॅन ॲक्शन हिरो' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इंडीयन आयडॉल शोमध्ये आले होते. याचदरम्यान त्यांनी भरपूर गप्पा मारल्या.

ayushmann khurrana
Big Boss16: निमृत कौरच्या बॉयफ्रेंडची बिग बॉसमध्ये एंट्री? लोक म्हणताय, ‘बिचारा अब्दु’

यावेळी आयुष्मानने नेहा कक्करशी संबंधित एक किस्साही सांगितला जो एकून सगळ्यांना आश्चर्यही वाटले आणि तो किस्सा ऐकून सगळे हसायलाही लागले. यानंतर आयुष्मान सांगतो, 'मला आणि नेहाला इंडियन आयडॉलमधून एकाच दिवशी रिजेक्ट करण्यात आले होते. आणि आम्ही मुंबईहून दिल्लीला ट्रेनने परत जात होतो. आम्ही 50 जण होतो आणि एकत्र रडत होतो. नेहा आज जज आहे आणि आज मी इथे आलो आहे, त्यामुळे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे’.

ayushmann khurrana
Big Boss 16: शिव ठाकरे स्वत: बिग बॉस बाहेर जाणार?

यावेळी आयुष्मानमे त्याच्या 'अ‍ॅक्शन हिरो' या चित्रपटाबद्दलही सांगितले. या चित्रपटात तो एका सुपरस्टारची भूमिका साकारत आहे.. मग अशी परिस्थिती येते जेव्हा जयदीप अहलावतचे पात्र भुरा सोलंकी त्याच्या मागे लागतो. आदित्य नारायणने दोघांनाही त्यांच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर आयुष्मान त्याच्या 'दम लगा के हैशा' या चित्रपटातील 'दर्द करारा' गाण्यावर स्पर्धकांसोबत डान्स करतो आणि नंतर 'नजम-नजम' गातो. त्यानंतर तो त्याच्या 'अ‍ॅक्शन हिरो' चित्रपटातील गाण्यावरही दमदार डान्स करतो.

हेही वाचा: महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com