Hows the Josh बॉलिवूडकर म्हणतायत.. High Sir!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

मुंबई : भारतीय लष्कराच्या जवानांनी केलेल्या धाडसी 'सर्जिकल स्ट्राईक'वर आधारलेल्या 'उरी' या चित्रपटाचे हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांनी कौतुक केले आहे. 'उरी'मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलने ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे आणि यामध्ये हिंदीतील अनेक कलाकार 'जय हिंद'चा जयघोष करताना दिसत आहेत. 

भारतीय लष्कराच्या या कामगिरीवर आधारित 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट आज (शुक्रवार) झळकला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी या कलाकारांचा एक व्हिडिओ विकी कौशलने अपलोड केला होता. त्यात निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, एकता कपूर, रणवीरसिंह, रणबीर कपूर, आलिया भट, वरुण धवन, रोहीत शेट्टी, आयुष्मान खुराना, सिद्धार्थ मल्होत्रा, राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर दिसत आहेत. 

'उरी'मधील विकीचा Hows the josh' हा संवाद लोकप्रिय झाला आहे. त्याच संवादाची पुनरावृत्ती या व्हिडिओमध्ये झालेली दिसत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood brigade cheer for Vicky Kaushal starrer Uri The Surgical Strike