अम्फन चक्रीवादळाचं नवं संकट, बॉलिवूडकर म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

या वादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये अक्षरशः हाहाकरा माजवला आहे. कोरोनासारखं संकट अधिक गडद होत असताना हे नवं संकट उभं राहिलं आहे. या वादळामध्ये बळी गेलेल्या लोकांना आता बॉलिवूडकरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुंबई : संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढत असताना पश्चिम बंगालमध्ये आलेल्या अम्फन या चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं. या वादळामुळे 72 जणांचा बळी गेला. या वादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये अक्षरशः हाहाकरा माजवला आहे. कोरोनासारखं संकट अधिक गडद होत असताना हे नवं संकट उभं राहिलं आहे. या वादळामध्ये बळी गेलेल्या लोकांना आता बॉलिवूडकरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीकडेही आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे असे हे बॉलिवूडकर म्हणत आहेत.

हे ही वाचा - आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनला मिळाली आता जागतिक ओळख

पश्चिम बंगालमध्ये आलेल्या अम्फन या चक्रीवादळामुळे अनेक जणांना आपला प्राण गमवावा लागला. तसेच अनेक भागांमध्ये जलमय परिस्थिती निर्माण झाली. येथील सारे फोटो सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. अशामध्ये अभिनेता आयुष्मान खुराणाने या चक्रीवादळामध्ये आपला प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत ट्विट केले आहे.

आयुष्मान म्हणतो, या चक्रीवादळामुळे निर्माण झालेली भयाण परिस्थिती पाहणं खरंच दुर्देवी आहे. पश्चिम बंगाल, बांग्लादेश, ओडीसा येथे या परिस्थितीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो. या वादळामध्ये ज्यांनी आपले प्राण गमावले हे पाहून खूप वेदना होतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

We all need to think . #Repost @freddy_birdy ... . #prayforbengal #helpbengal #cycloneamphan #give #nomediacoverage

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

तर दुसरीकडे अभिनेत्री करिना कपूर खानने देखील पश्चिम बंगालमध्ये, ओडिशा येथील काही फोटो तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सारे रस्त्ये जलमय झालेले दिसत आहेत. तसेच येथील जनजीवन कशा प्रकारे विस्कळीत झाले आहे याचे चित्र पाहायला मिळत आहे.

काही लोकं आपलं सामान डोक्यावर घेऊन जाताना दिसताहेत. तसेच येथील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात झाडं कोसळलेली दिसत आहेत. हे सारे फोटो शेअर करताना करिना म्हणते, आपल्याला या साऱ्या गोष्टींचा देखील विचार करायला हवा.

तसेच कियारा अडवाणी, अर्जुन कपूर, अनुष्का शर्मा, भूमी पेडणेकर, अनन्या पांडे यांसारख्या कलाकारांनी देखील या वादळामध्ये आपला जीव गमावलेल्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. कोलकाता विमानतळालाही या वादळाचा मोठा फटका बसला. विमानतळ ही जलमय झालं होतं.  

bollywood celebrity reaction on cyclone amphan 72 deaths


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood celebrity reaction on cyclone amphan 72 deaths