धर्मेंद्र - शबाना आझमींचा रोमँटिक फोटो हेमा मालिनीला टॅग, चाहत्यांचा खोडसाळपणा|Bollywood Dharmendra Shabana Azmi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Dharmendra Shabana Azmi Photo

धर्मेंद्र - शबाना आझमींचा रोमँटिक फोटो हेमा मालिनीला टॅग, चाहत्यांचा खोडसाळपणा

Bollywood News: बॉलीवूडमध्ये गेल्या चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये धर्मेंद्र यांच्या नावाचा समावेश करावा लागेल. (Bollywood Actor) हटके स्टाईल, कडक भूमिका, संवादफेक, वेगळा अंदाज यामुळे धर्मेंद्र नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिले आहेत. ते आता त्यांच्या एका फोटोमुळे चर्चेत आले आहे. त्या फोटोमध्ये ते आणि प्रख्यात अभिनेत्री शबाना (Bollywood Actress) आझमी हे रोमँटिक अंदाजात दिसत आहे. एकीकडे या फोटोला चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंटस दिल्या आहेत. दुसरीकडे काही चाहत्यांनी खोडसाळपणा करत तो फोटो चक्क हेमा मालिनी यांना टॅग केला आहे. अखेर त्यावर अभिनेते धर्मेंद्र यांना खुलासा करावा लागला आहे. त्यामुळे चाहत्यांचा काही भरोसा नसून त्यांच्या मनात आल्यावर ते काहीही करु शकतात. याचा अनुभव धर्मेद्र यांनी घेतला आहे.

धर्मेंद्र हे सध्या करण जोहर दिग्दर्शन करत असलेल्या एका चित्रपटामध्ये काम करत आहे. त्याचे नाव रॉकी रानी की प्रेम कहानी असे आहे. त्यामध्ये त्यांच्या समवेत शबाना आझमी आहेत. त्यामध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्याही भूमिका आहेत. दोन वर्षांपासून या चित्रपटाच्या प्रमोशनविषयी बोललं जात आहे. कोरोनाचा मोठा फटका करण जोहरच्या प्रोजेक्टला बसल्याचे दिसून आले आहे. 2019 मध्ये रणवीनं गली बॉय पूर्ण केल्यानंतर या चित्रपटाचे शुटींग पूर्ण केले होते. मात्र त्यात अनेक अडचणी आल्याचे दिसून आले होते. धर्मेंद्र यांना आता चाहत्यांनी वेगवेगळ्या शुभेच्छा दिल्या असून त्यावर त्यांनी यासगळ्या प्रकाराला वेडेपणा म्हटला आहे. चाहत्यांना कोण काय म्हणणार, असंही धर्मेंद्र यांनी म्हटलं आहे.

Dharmendra romantic poster

Dharmendra romantic poster

धर्मेंद्र यांनी जेव्हा शबाना आझमी यांच्यासोबत फोटो शेयर केला तेव्हा त्यावर इश्क है मुझे कॅमेरे से और कॅमेरे को....शायद मुझ से....अशा प्रकारची प्रतिक्रिया धर्मेंद्र यांनी दिली आहे. त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा एक फोटो व्हाय़रल केला आहे. यावेळी फॅन्सनं म्हटलं आहे की, प्लीज आपण शायद या शब्दाचा वापर करु नका. कॅमेरा हा गेल्या काही वर्षांपासून आपली साथ करतो आहे. आणि तो आपल्या प्रेमातही आहे. त्यामुळे आपण जे काही म्हणता आहात ते बरोबर नाही.

Web Title: Bollywood Dharmendra Shabana Azmi Photo Viral Tweeter Tag To Hema Malini

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top