मार्चमध्ये बॉलीवूडचा दणका; सहा चित्रपट होणार प्रदर्शित

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 3 March 2021

आता थोड्याफार फरकानं परिस्थिती सुधारत आहे. अशावेळी काही निर्माते आणि दिग्दर्शक य़ांनी चित्रपट प्रदर्शनासाठी पुढाकार घेतला आहे.

मुंबई -  बॉलीवू़डला मोठ्या प्रमाणात फटका कोरोनाच्या काळात सहन करावा लागला होता. त्यामुळे अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले होते. कित्येक चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होते. मात्र कोरोनाचा फटका त्यांना बसला होता. आता थोड्याफार फरकानं परिस्थिती सुधारत आहे. अशावेळी काही निर्माते आणि दिग्दर्शक य़ांनी चित्रपट प्रदर्शनासाठी पुढाकार घेतला आहे. मार्च महिन्यात चक्क सहा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आतापर्यत 20 चित्रपटांच्या तारखा रिलीज झाल्या आहेत.

* हाथी मेरे साथी - हा सिनेमा 26 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यात बाहुबली फेम अभिनेता राणा दुग्गातीची भूमिका पाहायला मिळणार आहे. त्याच्या जोडीला विष्णू विशान, पुलकित सम्राट, आदी कलाकारही दिसणार आहेत.

* मुंबई सागा - जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 19 मार्चला प्रदर्शित होणार आहे. गुन्हेगारी जगताचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. जॉनची एक वेगळी भूमिका यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दोन्ही अभिनेत्यांचे कलाकार त्यांचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

* फौजी कॉलिंग - हा सिनेमा 12 मार्चला प्रदर्शित होणार आहे. विनोदी अभिनेता म्हणून यापूर्वी शर्मन जोशी सर्वांना परिचित होता. आता या चित्रपटात त्याच्या वाट्याला आलेली भूमिका वेगळ्या प्रकारची आहे. ब-याच कालावधीनंतर तो चित्रपटात दिसणार आहे. सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा सर्वांच्या उत्सुकतेचा आहे.

* संदीप और पिंकी फरार - अर्जून कपूर आणि परिणिती चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपटट 19 मार्चला प्रदर्शित होणार आहे. परिणीतीचा नुकताच एक चित्रपट आला असून त्यालाही चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दिबाकर बॅनर्जी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

* रूही - मार्च महिन्यात प्रदर्शित होणार पहिला चित्रपट म्हणून रुहीचे नाव घ्यावे लागेल. 11 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यात राजकुमार राव, जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजकुमार रावचा हॉरर थ्रिलर सिनेमा यानिमित्तानं पाहायला मिळणार आहे.

* टाईम टू डान्स - या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात कॅटरिना कैफची बहिण इसाबेल प्रमुख भूमिका साकारणार आहे. तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यात सूरज पांचोली प्रमुख कलाकाराच्या भूमिकेत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood hungama on box office in march released six movie back to back