Karan Johar: माझी बायोपिक त्यानेच करावी... करननं सांगितलं अभिनेत्याच नाव.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan Johar

Karan Johar: माझी बायोपिक त्यानेच करावी... करननं सांगितलं अभिनेत्याच नाव..

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांमध्ये करण जोहरचं नाव घेतलं जातं. करणने वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्याने ब्लॉकबस्टर चित्रपट 'कुछ कुछ होता है' चं दिग्दर्शन केलं होतं. त्याचबरोबर त्याला अनेक वेळा ट्रोलही करण्यात येतं. तो नेपोटिझमला प्रोत्साहन देतो असंही म्हंटलं जातं. करण जोहरला बॉलिवूडच्या स्टारकिड्सचा गॉडफादर म्हणूनही ओळखले जाते. करण जोहरने बॉलीवूडमध्ये कितीतरी स्टार किड्सला त्याच्या चित्रपटात संधी दिली आहे. करण जोहरमुळे आज अनेक स्टार किड्स हे स्टार्सच्या यादीत आले आहेत .

नुकतचं त्याला जेव्हा त्याच्या बायोपिकबद्दल विचारण्यात आले तेव्हा भन्नाट असं उत्तर दिलयं. करणवर बायोपिक बनवणार की नाही हे अजून ठरलेले नाही, पण बायोपिक बनवले तर त्याच्या पात्र कोणं चांगल्याप्रकारे करु शकेल असं विचारल्यावर करण म्हणाला की, जर बायोपिक बनवली तर त्याची व्यक्तिरेखा रणवीर सिंगपेक्षा कोणीही उत्तमरित्या मोठ्या पडद्यावर साकारू शकणार नाही. करणने लाइव्ह शो दरम्यान याचं उत्तर दिलंयं

हेही वाचा: वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

मला वाटतं की रणवीर सिंग या पात्रासाठी योग्य असेल कारण तो अनेकदा रंग बदलतो. त्यामुळेच रणवीर माझी भूमिका पडद्यावर चांगल्या प्रकारे साकारण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल, त्याच्यापेक्षा चांगल हे काणीचं करु शकणार नाही

आधीपासूनच करण जोहरची इच्छा आहे की त्याची बालपणीची गोष्ट मोठ्या पडद्यावर दाखवावी. कारण त्याच्याकडे बालपणीच्या अनेक सुंदर आठवणी आहेत आणि त्याच्या पालकांनीही करणला अनेक चांगले धडे दिले आहेत. त्याने त्याच्या बालपणातही कठीण प्रसंग पाहिले आहेत. आज जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा तो स्वत:ला पूर्वीपेक्षा चांगला समजतो, असे दिग्दर्शक सांगतात. करणने लहान वयातच बॉलिवूडला 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'कभी अलविदा ना कहना' आणि माय नेम इज खान यांसारखे अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत.