Katrina-Vicky wedding anniversary: रबने नव्हे तर 'कॉफी विथ करण'ने बनवली जोडी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vicky-Katrina

Katrina-Vicky wedding anniversary: रबने नव्हे तर 'कॉफी विथ करण'ने बनवली जोडी...

बॉलीवूडमधील पॉवर कपल्सपैकी आणि लोकप्रिय जोडी कतरिना कैफ आणि विकी कौशल आज पहिल्या लग्नाच्या वाढदिवस साजरा करत आहे. हे लव्ह अनेकदा चर्चेत असतात. कधी कतरिना विकीचे फनी व्हिडिओ पोस्ट करते तर कधी विकी... दोघांची केमेस्ट्री खुप चाहत्यांना खुप आवडते. या दोघांनीही त्याचं नातं सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. लग्नाची बातमी येईपर्यंत कुणालाही याची भनक लागू दिली नाही. गेल्या वर्षी याच दिवशी दोघांचे लग्न झाले होते. यामूळे दोघांच्या प्रेम कसं जूळलं हे तुम्हाला सांगतो.

हेही वाचा: Vicky Kaushal: मालवणी जेवण आणि ठेचा म्हणजे.. विकी कौशल मराठमोळ्या जेवणाच्या प्रेमात

कतरिना आणि विकीची लव्हस्टोरी खूपच मजेदार आणि इंटरस्ट्रींग आहे. दोघांनीही लग्न होईल असं कधीच वाटलं नव्हतं. दोघांच्या नात्याला सुरवात झाली ती करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये. विकी जेव्हा करणच्या शोमध्ये आला तेव्हा करणने त्याला सांगितले की कतरिनाला त्याच्यासोबत काम करायचयं आहे. कारण दोघेही ऑनस्क्रीन एकत्र चांगले दिसतील असं कतरिनाला विश्वास आहे. हे ऐकून विकीला एकप्रकारे शॉकचं लागला. त्याच्या आनंदाला सीमाचं नव्हती. त्याने बेशुद्ध होण्याचे नाटक केले.

यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ एका शोमध्ये भेटले. जिथ होस्ट नव्हता तर टेप रेकॉर्डरमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना द्यावी लागणार होती. तेव्हा विकीने कतरिनाला विचारलं की, त्यांची पहिली भेट रेकॉर्ड होईल असं तिला कधी वाटलं होतं का? यावर कतरिना म्हणाली होती, एखाद्याला ओळखण्यासाठी ही चांगली जागा आहे.

त्याचवेळी, यंदाच्या कॉफी विथ करणमध्ये कतरिना कैफने तिची प्रेमकहाणी सर्वांना सांगितली. कतरिना म्हणाली होती, विकी माझ्या रडारवर कधीच नव्हता. मी नुकतचं विक्कीचं नाव ऐकलं होतं आणि मला त्याच्याबद्दल फारशी माहितीही नव्हती. आमची ना कधी भेट झाली ना कधी बोलणं झालं. पण झोया अख्तरच्या पार्टीत जेव्हा मी विकीला भेटले तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडले. कतरिनाने सर्वात आधी झोयाला तिच्या भावना सांगितल्या होत्या. झोयाच्या पार्टीनंतर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते.

हेही वाचा: Bigg Boss 16: एमसी स्टॅन शोमध्ये नाही तर बिग बॉस पाहणार नाही!

अशाप्रकारे दोघांच्या प्रेमाला सुरवात झाली . विकी आणि कतरिनाला त्यांच्या कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थीतीत गुपचूप लग्न करायचं होते. पण हळूहळू लग्नाची बातमी समोर आली. यानंतर दोघांनीही मुंबईपासून दूर राजस्थानमधील बरवाडा येथील सिक्स सेन्स फोर्ट हॉटेलमध्ये शाही पद्धतीने लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल झाले.