esakal | 'कुटूंब संकटात असेल तेव्हा', शाहरुख काय म्हणाला होता सलमानला?
sakal

बोलून बातमी शोधा

'कुटूंब संकटात असेल तेव्हा', शाहरुख काय म्हणाला होता सलमानला?

'कुटूंब संकटात असेल तेव्हा', शाहरुख काय म्हणाला होता सलमानला?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा किंग खान शाहरुख (bollywood king khan shahrukh khan) सध्या एका मोठ्या संकटात सापडला आहे. त्याचा मुलगा आर्यन (aryan khan) खान एनसीबीच्या कोठडीत आहे. अशावेळी त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी एसआरकेनं तयारी सुरु केली आहे. मात्र अजून त्याला त्यात यश आलेले नाही. आतापर्यत त्याला बॉलीवूडमधून मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेटींकडून सपोर्ट मिळाला आहे. अनेकांनी त्याला आधार देत आम्ही तुझ्या आणि आर्यनच्या पाठीशी आहोत अशा शब्दांत आपली सहानुभूती व्यक्त केली आहे. बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननं दोनवेळा शाहरुखची भेट घेतली आहे. काल सलमान आणि त्याचे वडील सलीम खान हे दोघेही शाहरुखच्या भेटीला गेल्याचे एका व्हिडिओतून दिसून आले होते.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शाहरुखनं सलमानला (salman khan) एक गोष्ट सांगितली होती. व्हायरल झालेला हा व्हिडिओ जूना असून काही नेटकऱ्यांनी तो सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शेयर केला आहे. त्यामध्ये सलमाननं शाहरुखला एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुख कमालीचा भावूक झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून किंग खान प्रचंड मानसिक तणावातून जात आहे. आर्यन खान प्रकरणानं त्याच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. मुंबई वरुन गोव्याला जाणाऱ्या त्या क्रुझ पार्टीमध्ये अनेकांनी ड्रग्ज बाळगले होते. त्यावरुन एनसीबीनं काही जणांना अटक केली होती. त्यात शाहरुखच्या मुलाचा आर्यन खानचाही समावेश होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ सलमानच्या दस का दम या कार्यक्रमातील आहे. त्या शो मध्ये सहभागी झालेल्या शाहरुखला सलमाननं एक प्रश्न विचारला होता. त्यावर शाहरुखनं सांगितलं होतं की, सलमान मी आणि माझं कुटूंब जेव्हा एखाद्या संकटात असेल तेव्हा तु नेहमीच माझ्यासोबत असशील. या व्हि़डिओला नेटकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. एका युझर्सनं त्याला कमेंट दिली आहे की, ही आहे खरी यारी....दुसऱ्यानं लिहिलं होतं, वा रे करण अर्जुन...काही दिवसांपासून शाहरुखच्या बंगल्यासमोर चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातून त्यांनी आर्यनला आपला पाठींबा जाहीर केला आहे.

हेही वाचा: Mumbai : आर्यन खान जामिन ; एनसीबीने केला विरोध

हेही वाचा: "खान आडनावामुळे आर्यन पीडित अन् सुशांत हिंदू असल्यामुळे व्यसनाधीन?"

loading image
go to top