बॉलीवूडचे ज्येष्ठ गीतकार योगेश यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

कवी व गीतकार योगेश यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे झाला. ते १६ वर्षांचे असताना लखनऊवरून मुंबईला आले.

मुंबई- 'ना बोले तुम ना मैने कुछ कहां', 'रिमझिम गिरे सावन', 'रजनीगंधा फुल तुम्हारे', 'कही दूर जब दिन ढल जाये', 'जिंदगी कैसी ये पहेली', 'जाने मन जाने मन..' यांसारख्या सुमधुर गाण्यांचे गीतकार योगेश  उर्फ योगेश गौर यांचे आज वसई येथे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या मागे एक मुलगा आणि दोन मुली तसेच नातवंडे असा परिवार आहे.

हे ही वाचा: भाऊ असावा तर असा.. अक्षय कुमारने बहिणीला कोरोनापासुन वाचवण्यासाठी केलं संपूर्ण विमानच बूक

कवी व गीतकार योगेश यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे झाला. ते १६ वर्षांचे असताना लखनऊवरून मुंबईला आले. त्यावेळी त्यांची गाणी हृषिकेश मुखर्जी यांनी ऐकली आणि त्यांना 'आनंद' चित्रपटासाठी संधी दिली. आनंदमधील त्यांची गाणी कमालीची लोकप्रिय ठरली.

त्यानंतर त्यांनी रजनीगंधा, मंजिल, इंग्लिश बाबू देसी मेम, छोटी सी बात, मिली, बातो बातो  में, दुल्हारा, चोर और चांद, प्रियतमा, दिल्लगी अशा कित्येक हिट चित्रपटांसाठी गाणी लिहिली. सलील चौधरी आणि त्यांची जोडी चांगली जमली होती.

सलील चौधरी यांच्याबरोबरच एस. डी. बर्मन, राजेश रोशन, आर. डी. बर्मन, निखिल-विनय अशा कित्येक संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले. शंभरहून अधिक चित्रपट आणि दोनशेहून अधिक मालिकांची शीर्षक गीते त्यांनी लिहिली. रजनी, टीचर अशा काही गाजलेल्या मालिकांची गीते त्यांनी लिहिली. अत्यंत मनमिळावू आणि सरळ-साधा असा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी लिहिली. 

bollywood lyricist yogesh passes away


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood lyricist yogesh passes away