Mohan Kapoor: अल्पवयीन मुलीला पाठवायचा अश्लील फोटो, प्रसिद्ध अभिनेत्यावर अत्याचाराचा आरोप... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohan Kapoor

Mohan Kapoor: अल्पवयीन मुलीला पाठवायचा अश्लील फोटो, प्रसिद्ध अभिनेत्यावर अत्याचाराचा आरोप...

भारतातील प्रसिद्ध अभिनेते त्याचबरोबर 'मार्वल' चित्रपटात काम करुन लोकप्रिय झालेले मोहन कपूर याच्यावर एका अल्पवयीन तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. एका १५ वर्षीय तरुणीने त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तरुणीने सोशल मीडियाची मदत घेऊन ही भयानक गोष्ट शेअर केली आहे. त्याच बरोबर सांगितले की त्याच्या एक्स गर्लफ्रेंडलाही या छळाची माहिती होती पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप पीडितेने केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडितेने सोशल मीडियावर लिहिले की, 'मी 14 वर्षांची असताना एका सीरियलच्या अभिनेत्रीची फॅन होते आणि आमची मैत्री झाली. त्यावेळी अभिनेत्रीचा पार्टनर मोहन कपूरनेही माझ्याशी मैत्री केली. मी माझ्या आई-वडिलांप्रमाणे दोघांचाही आदर करायची. तसेच माझ्या आयुष्यातील सर्व समस्या त्यांच्यासोबत शेअर केल्या, पण मोहन कपूरने माझा गैरफायदा घेतला.

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

पीडितेने सांगितले, 'मोहन कपूरने माझ्याशी फ्लर्ट करायला सुरुवात केली. हे मला समजल्यावर मी त्याच्याशी बोलणे बंद केले होते. त्यानंतर जेव्हा मी १५ वर्षांची झाले तेव्हा मोहन कपूरने मला स्वतःचा एक आक्षेपार्ह फोटो पाठवला. यानंतर तो सतत माझी माफी मागत होता आणि दुःखी होता. मी त्याला माफही केले, पण त्यानंतरही मोहन कपूरने मला त्रास देणे थांबवले नाही. त्यांनी मला पुन्हा त्रास दिला.'

पीडितेने सांगितले की, 'मोहन कपूरला माझ्याशी लग्न करायचं होते. त्याने मला सांगितले की त्याचे माझ्यावर प्रेम आहे आणि त्याला लग्न करायचे आहे. माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे असल्याने मी लवकर मोठे व्हावे,अशी त्यांची इच्छा असल्याचंही तिने सांगितले.

इतकच नाही तर यामुळे ती खूप डिप्रेशनमध्ये आली होती आणि तिला आत्महत्या करावीशी वाटत असल्याचं पीडितेने सांगितलं. दुसरीकडे, या सर्व आरोपांनंतर मोहन कपूर यांनी त्यांचे ट्विटर अकाऊंट निष्क्रिय केले आहे. यावर मोहन यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.