Jug Jug Jio Movie: महाराष्ट्रीयन त्यामुळे मला... वरुणची प्रांजळ कबूली

बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सुरु असतानाच काही चित्रपटांबाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे.
Bollywood News
Bollywood News esakal

Bollywood Vs Tollywood News: बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सुरु असतानाच काही चित्रपटांबाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. एकीकडे वेगवेगळ्या स्टारचे चित्रपट फ्लॉप होत असताना दुसरीकडे (Bollywood Movies) बॉलीवूडमधील काही चित्रपटांनी लक्ष वेधून घेतले आहे. सध्या प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री कियारा अडवाणीच्या जुग जुग जियोची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. हे दोन्ही कलाकार पुण्यात या चित्रपटाच्या (Entertainment News) प्रमोशनसाठी आले होते. दरम्यान वरुणनं काही खास आठवणींना यावेळी दिला. त्या सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत.

प्रसिद्ध अभिनेता वरूण धवन हा त्याच्या आगामी प्रदर्शित होणाऱ्या "जुगजुग जिओ" चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकताच पुण्यातील सिजन मॉल या ठिकाणी (Varun Dhawan movie) आला होता. टेनेट मिडियाक्रोपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये वरून पत्रकारांशी मराठीध्ये भरभरून बोलत होता. यावेळी बोलताना तो म्हणाला की "मी महाराष्ट्रीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे". माझे वडील डेव्हिड धवन यांनी पुण्यातील एफ टी आय मधून शिक्षण पूर्ण केले. तसेच बदलापूर या माझ्या चित्रपटाचे चित्रिकरण पुण्यातचं झाले. त्यामुळे मला पुण्याविषयी आपुलकी आहे.

Bollywood News
Video: छातीभोवती गुंडाळून फटाके पेटवले, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

वरुण धवन पुढे म्हणाला की मी मराठी चित्रपट आवडीने बघतो. मला ते आवडतात. "जुगजुग जिओ" या चित्रपटात वडील व मुलाच्या हळुवार नात्याची गोष्ट रसिकांना पाहता येणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी, अनिल कपूर, नितु कपूर, प्राजक्ता कोळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करण जौहरचा निर्मीत व या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. कोरोनाच्या महामारी नंतर कौटुंबिक चित्रपट "जुगजुग जिओ" प्रदर्शित होत आहे. रसिकांनी तो चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पहावा. असे आवाहन सद्याची आघाडीची अभिनेत्री कियारा अडवाणीने केले.

Bollywood News
Video: 'ब्रह्मास्त्र' सिनेमाता दीपिका पादुकोण महत्वाच्या भूमिकेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com