
Nora Fatehi: इडी कार्यालयात नोरा; चौकशीचा ससेमिरा काही थांबेना
अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही कॉनमन सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चांगलीच अटकली आहे. याप्रकरणामूळे तिची इडीच्या अधिकाऱ्यांनकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात ती दाखल झाली आहे. नोराची याआधीही अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे आणि पुराव्यांच्या आधारे तिला बोलावण्यात आले आहे.
नोराला सुकेश चंद्रशेखर यांच्या बद्दल विचारण्यात येईल आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) कलमांतर्गत तिचा जवाब नोंदविला जाइल असं पीटीआयने म्हटले आहे. तर नोरा साक्षीदार म्हणून तपास यंत्रणेला मदत करत असल्याचं तिच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.
हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
या प्रकरणी नोरा फतेहीशिवाय जॅकलिन फर्नांडिसचीही चौकशी करण्यात आली आहे. ईडीने आपल्या आरोपपत्रात अभिनेत्रीचे नाव आरोपी म्हणून ठेवले होते. गेल्या महिन्यात जॅकलिनला 2 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या जामीनावर जामीन मंजूर करण्यात आला होता.
तसेच या आठवड्याच्या सुरुवातीला, पोलिसांनी पिंकी इराणीला अटक केली होती, तिने जॅकलीन फर्नांडिसची सुकेश चंद्रशेखरशी ओळख करून दिली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार, जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांना कथित आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून अनेक आलिशान कार आणि इतर महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या.