'अमूल द टेस्ट ऑफ इंडिया' टॅगलाईनच्या निर्मात्यांचं निधन

चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिध्द अभिनेता राम कपूर यांचे वडिल अनिल कपूर यांचे निधन झाले आहे.
bollywood ram kapoor father anil kapoor passed away
bollywood ram kapoor father anil kapoor passed away Team esakal
Updated on

मुंबई - चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिध्द अभिनेता राम कपूर यांचे वडिल अनिल कपूर यांचे निधन झाले आहे. ते बिली म्हणून सर्वांमध्ये परिचित होते. तसेच चे एका अॅडव्हर्टटायझिंग कंपनीचे सीइओ म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. प्रसिध्द अमुल कंपनीची आजची जी टॅगलाईन आहे अमूल द टेस्ट ऑफ इंडिया ती अनिल यांची होती. त्यांच्या जाण्यानं जाहिरात विश्व आणि कपूर फॅमिलीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते एक उद्योजकही होते. वडिलांच्या निधनाविषयी राम कपूरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. चाहत्यांनी त्याच्या वडिलांना श्रध्दांजली वाहिली आहे.

अमूलनं ही त्यांना सोशल मीडियावर भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांनी असे सांगितले की, अनिल कपूर हे नेहमीच आपल्या सोबत राहणार आहेत. यावेळी राम कपूर यांनी बिलबोर्डचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अमूलनं जी श्रध्दांजली वाहिली आहे त्यामुळे मी निशब्द झालो आहे. माझे वडिल हे एक महान व्यक्तिमत्व होतं. ते माझ्यासाठी प्रेरणा होते. मी त्यांना नेहमीच मिस करेल. मला त्यांची नेहमीच आठवण येईल. या शब्दांत राम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गौतमीनं याविषयी गुरुवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिनं लिहिलं होतं, बाबा नेहमीच आमच्या हद्यात राहतील. मी ज्यांना सर्वात प्रभावी आणि खंबीर व्यक्तिमत्व समजते त्यात बाबांचे नाव घ्यावे लागेल. राम कपूर यांचे वडिल हे बिलीच्या नावानं प्रसिध्द होते. ते एका मोठ्या जाहिरात कंपनीचे सीइओही होते. अमूल सारखी कंपनी त्यांची क्लाइंट होती अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांनीच अमूलची ती प्रसिध्द टॅगलाईन तयार केली होती. जी आजही लोकांच्या मनात ताजी आहे. राम कपूर हा प्रसिध्द चित्रपट आणि टीव्ही कलाकार आहे. तो आतापर्यत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दिसून आला आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणारा राम कपूरचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे.

बडे अच्छे लगते है नावाच्या मालिकेतून राम लोकप्रिय झाला. त्याचे नाव झाले आणि तो लाईमलाइट मध्ये आला. राम कपूरचा सोशल मीडियावर फॅनफॉलोअर्स मोठा आहे. तो नेहमी आपल्या फॅन्ससोबत सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. कॉमेडी रोलसाठी रामनं केलेल्या भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीच्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com