Shilpa Shetty: घरोघरी मातीच्या चुली! शिल्पाच्या घरातही बहीण-भावाची फ्री स्टाईल; व्हिडिओ पाहून आठवेल लहानपण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shilpa Shetty

Shilpa Shetty: घरोघरी मातीच्या चुली! शिल्पाच्या घरातही बहीण-भावाची फ्री स्टाईल; व्हिडिओ पाहून आठवेल लहानपण...

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांबद्दल त्यांच्या चाहत्यांना खास आकर्षण असते. त्यात करिना, करण, सनी नेहमी आपल्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यातच आज देशभरात सर्वत्र बालदिन 2022 साजरा केला जात आहे. यानिमित्तानं सेलिब्रिटीही सोशल मीडियावर आपल्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत.

शिल्पा शेट्टीनेही तिच्या दोन्ही मुलांचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. याव्हिडिओमध्ये दोघं भाऊ-बहीण फ्रि स्टाइल भांडताना दिसत आहेत.  वियान आणि समीषाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा: मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

मात्र, हे दोघ भांडतांना फार क्यूट दिसताय. हा व्हिडिओ शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यात दोघं भावंड एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये समीषा भावाच्या अंगावर बसून मस्ती करत आहे. त्यानंतर वियान तिला खाली पाडतो. ती पुन्हा उठून त्याच्या त्याचे केस ओढते आणि वियान जोरजोरात ओरडू लागतो.

हेही वाचा: Shilpa Raj Kundra:'बायकोमुळं तुला किंमत नाहीतर कोण विचारतो'!

हा  मजेदार व्हिडिओ शेअर करत शिल्पाने कॅप्शन दिलंय की, 'हे हसू माझं रोजचं मोटिव्हेशन आहे. माझ्या आयुष्यातील सगळ्यात प्रेमळ स्ट्रेस बस्टर आणि एनर्जी-इन्फ्यूजर होण्यासाठी दोघांचे आभार मानू शकत नाही. आपल्या आतील बालपण जिवंत ठेवायला हवं.. सर्वाना बालदिनाच्या हार्दिक शूभेच्छा!’

तिच्या या व्हिडिओवर खुप गमतीदार प्रतिक्रिया येत आहे. यावरुन सामान्याची मूलं असो किंवा सेलिब्रिंटीची सर्वच भाऊ बहिण भांडतात हे मात्र खरं...शिल्पा शेट्टी लवकरच 'सुखी' चित्रपटात दिसेल त्याचबरोबर ती रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या डेब्यू वेब सीरिजमध्येही दिसणार आहे.