
बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक कुणाल गांजावालाचं बऱ्याच कालावधीनंतर एक मराठी गाणं व्हायरल झालं आहे. त्याला सोशल मीडियावरुन चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कुणाल गांजावाला यांच्या त्या गाण्याची मोठ्या प्रमाणात चर्चाही होती. निक शिंदे यांनीही हे गाणं गायलं आहे. तरुणाईचं लक्ष वेधून घेणाऱ्या या गाण्यानं सोशल मीडियावर लाखो व्ह्युज मिळवले आहेत. गांजावाला यांनी एक भन्नाट मराठी गाणं गायलं आहे. हे गाणं 1 मिलियनहून अधिक मराठी इन्फ्ल्युएन्सर असलेला अभिनेता निक शिंदेवर चित्रीत झालेलं आहे.
एस प्रॉडक्शन निर्मित, सचिन कांबळे दिग्दर्शित, हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. गाण्याचे गीत-संगीत सुप्रसिध्द संगीतकार जोडी कुणाल-करण ह्यांचे आहे. कुणाल गांजावाला आणि सोनाली सोनावणेने गायलेले हे गाणं निक शिंदे आणि सानिका भोईतेवर चित्रीत झालेले आहे. ह्या गाण्याचं वैशिष्ठ्य म्हणजे मराठी, कोकणी, कन्नड अशा तीन भाषांचा मिलाफ ह्या गाण्यात पाहायला मिळतोय. याविषयी एस प्रॉडक्शनचे निर्माते अजय अंकुश पाटील म्हणाले, ”इसक झालं रं या रोमँटिक गाण्याला 10 मिलीयनपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. त्यामुळे दुसरं गाणंही धमाकेदार आणण्याचा विचार चालू असतानाच कुणाल-करणने मला भन्नाट पोरगी गाणं ऐकवलं. आणि ऐकताक्षणीच ठेका धरायला पटकन भाग पाडणा-या ह्या गाण्याची निर्मिती करायचा मी विचार केला.”
कुणाल-करण ह्यांनी पहिल्यांदाच बॉलीवुड गायक कुणाल गांजावाला ह्यांच्यासोबत काम केलं आहे. त्या अनुभवाविषयी कुणाल-करण सांगतात, “साउथ इंडियन बाजाचं मराठी गाणं आहे, आणि सुप्रसिध्द गायक कुणाल गांजावाला ह्यांचा आवाज ह्या गाण्यासाठी चपखल बसेल असं वाटल्याने कुणालसरांना आम्ही संपर्क साधला. संगीतकाराला नक्की काय लकबी अपेक्षित आहे, त्याप्रमाणे गाण्याची कला त्यांच्यात अप्रतिम आहे.” सुप्रसिध्द गायक कुणाल गांजावाला म्हणाले,” मराठी, कोकणी, कन्नडा अशा तीन भाषांचा मिलाफ असलेलं रोमँटिक गाणं आहे. नावाप्रमाणेच गाणं भन्नाट आहे. नवीन संगीतकारांसोबत गाण्याचा अनुभव खूपच चांगला होता.”
भन्नाट पोरगी गाण्याचं दिग्दर्शन अनेक सुपरहिट म्युझिक व्हिडीयोचे दिग्दर्शक सचिन कांबळे ह्यांनी केलंय. ते म्हणतात,”दाक्षिणात्य ठेक्यावरचं मराठी गाणं असल्याने साउथ इंडियन मुलगी आणि मराठी मुलाची एक रोमँटिक लव्हस्टोरी ह्यात आम्ही चित्रीत केली. गाण्यात डान्स करताना खूप एनर्जीची आवश्यकता होती. त्यामुळे निक-सानिकाची निवड करण्यात आली..” निक शिंदे गाण्याविषयी सांगतो, “ हा माझा सहावा म्युझिक अल्बम आहे. मी पहिल्यांदाच एवढा भन्नाट डान्स केलाय. गाण्यातल्या एका सिक्वेन्समध्ये मला लुंगी घालून डान्स करायचा होता. खरं तर, साउथ सिनेमांचा मी खूप मोठा चाहता आहे. त्यांना लुंगी घालून नाचताना पाहताना मलाही तसं नाचावसं वाटायचं. पण जेव्हा मला लुंगी घालून नाचायचं होतं.तेव्हा मात्र मी खूप अवघडल्यासारखा झालो होतो. पण हे एवढं एनर्जेटिक गाणं करून खूप मजा आली.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.