esakal | गायिका नेहा कक्करच्या लग्नाची पुन्हा चर्चा, पंजाबी गायकासोबत करणार लग्न?
sakal

बोलून बातमी शोधा

neha kakkar

नेहा याआधी अभिनेता हिमांश कोहलीसोबत बराच काळ रिलेशनशिप राहिली आहे. आता नेहा पुन्हा एकदा तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.

गायिका नेहा कक्करच्या लग्नाची पुन्हा चर्चा, पंजाबी गायकासोबत करणार लग्न?

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई-  बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर अनेकदा तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. मसलनच्या सिंगिंग रिऍलिटी टीव्ही शो इंडियन आयडलच्या मागच्या सिझनमध्ये सतत अशी चर्चा होत होती कि नेहा कक्कर आणि आदित्या नारायण लग्न करणार आहेत. मात्र यानंतर या शोनेच जाणूनबुजुन अशी हवा केल्याचं समोर आलं होतं. दोघांमध्ये असं काहीच नव्हतं. नेहा याआधी अभिनेता हिमांश कोहलीसोबत बराच काळ रिलेशनशिप राहिली आहे. आता नेहा पुन्हा एकदा तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.

हे ही वाचा: 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याच्या पत्नीला कोरोनाची लागण  

नेहा कक्कर आणि हिमांश कोहली यांच्या रिलेशनशिपविषयी सगळ्यांनाच माहित होतं. असं म्हटलं जात होतं की दोघांची लग्नापर्यंत बोलणी झाली होती. मात्र दोघांचं ब्रेकअप झालं आणि सोशल मिडियावर दोघंही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांसोबत भिडताना दिसले. आता नेहाच्या लग्नाच्या बातम्या पुन्हा एकदा समोर येऊ लागल्या आहेत. यावेळी नेहाने ठरवलंय की ती नक्की लग्न करणार आहे.

अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार गायक रोहनप्रित सिंहमुळे असा दावा केला जात आहे की रोहनप्रित आणि नेहा या महिन्याच्या अखेरीस लग्न करु शकतात. दोघांमध्ये लग्नाची बोलणी फायनल झाल्याचं कळतंय.रोहनप्रित सिंह रायजिंग स्टार सिंगिग रिऍलिटी शोचा उपविजेता होता. सोबतंच 'बिग बॉस' फेम शेहनाज गिलच्या टीव्हीवरिल स्वयंवरच्या शोमध्ये 'मुझसे शादी करोगे'मध्ये दिसला होता.

रोहनच्या आवाजासोबतंच त्याच्या स्वभाव देखील तितकाच सौम्य आहे. शेहनाजला देखील रोहन आवडत होता मात्र काही महिन्यांनंतर असं कळालं की रोहनने नेहा कक्करची निवड केली आहे. सध्या रोहन नेहासोबत इंस्टाग्रामवर अनेक पोस्ट करताना दिसतोय.    

singer neha kakkar all set to tie to knot with punjabi singer rohanpreet singh