भलतेच ' बोल्ड '  चित्रपट, ज्याची सर नाही कशाला

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

आपण बॉलीवूडमधल्या अशा काही चित्रपटांची माहिती घेणार आहोत जे त्यांच्या बोल्डनेसमुळे जास्त चर्चेत आले होते.

मुंबई -  बॉलीवूडमध्ये बोल्ड चित्रपट नाहीत असे आता कुणी म्हणणार नाही. साधारण पंधरा ते वीस वर्षांपूर्वीचे चित्रपटही भलतेच बोल्ड होते. सध्याच्या वेबमालिकेच्या दुनियेत बोल्ड हा शब्दच फार गुळगुळीत झाला आहे. जवळपास प्रत्येक मालिकेत बोल्डनेस भरला आहे. लव. क्राईंम, सेक्स यांच्यात अडकून पडलेल्या वेबसीरीजमधून इंटिमेट दृश्यांचा भडिमार करण्यात आला आहे.

आता आपण बॉलीवूडमधल्या अशा काही चित्रपटांची माहिती घेणार आहोत जे त्यांच्या बोल्डनेसमुळे जास्त चर्चेत आले होते. ते चित्रपट प्रदर्शित होण्यास काही अंशी विरोधही झाला होता. प्रेक्षकांनीही त्याला अधिक पसंद केले होते. कोणेएके काळी या चित्रपटांनी मोठी खळबळ उडवून दिली होती.

1. मर्डर - अभिनेत्री मल्लिका शेरावच्या हॉट सीनमुळे हा चित्रपट अधिक चर्चेत आला होता. किसिंग दृश्यांचा भरणा असणारा हा चित्रपट त्यावेळी भलताच लोकप्रिय झाला. मल्लिका आणि इमरान हाश्मिचा तो सीन पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत होते. 

2.  'कामसूत्र' - बॉलीवूडमधील सर्वाधिक बोल्ड असणारा चित्रपट म्हणून कामसुत्र या चित्रपटाचे नाव घेतले जाते. त्यावेळी या चित्रपटावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. सेक्स हा या चित्रपटाचा मुख्य विषय होता. त्यात काम केलेल्या अभिनेत्रींनी बरेच हॉट सीन दिले होते. 

3.  'गर्लफ्रेंड' - 2004 मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा राजदान यांनी दिग्दर्शित केला होता. त्याच्यात ईशा कोपीकर हिनं मुख्य भूमिका केली होती. याचबरोबर अमृता अरोरा, आशिष चौधरी, सुमीत निझावान यांनी काम केले होते. बोल्डनेसचा वेगळा ट्रेंड या चित्रपटानं आणला असे म्हणता येईल.

 4. 'हवस' - एरोटिक थ्रिलर म्हणून हवस या चित्रपटाचे नाव घ्यावे लागेल. या चित्रपटात अभिनेत्री मेघना नायडू, शावर अली, तरुण अरोरा यांच्या भूमिका होत्या. चित्रपटाच्या नावावरुनच त्यात काय असेल याची कल्पना येते. 

5. 'जूली' - नेहा धुपियाला वेगळी ओळख या चित्रपटामुळे मिळाली. 2004 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. चित्रपटात नेहा एका मुलाचे वारंवार लैंगिक शोषण करत असल्याचे दाखविण्यात आले आहे. नेहानं केलेल्या अभिनय़ाचे कौतूक झाले होते.

6. 'जिस्म 2' - सर्वाधिक बोल्ड चित्रपट म्हणून जिस्म 2 चा उल्लेख करता येईल. पहिल्या भागात बिपाशा आणि जॉन अब्राहम यांचा किसिंग सीन हिट झाला होता. यातील असे काही दृश्य आहेत की ते आपण घरात एकटेपणानं पाहु शकणार नाहीत. सनी लिओनीला दिग्दर्शकानं मोठ्या खुबीनं या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रित केलं आहे.

7. बी ए पास (B.A.Pass) - 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अजय बहल याने केले होते. आणि त्याचे निर्माते नरेंद्र सिंह होते. चित्रपटात शिल्पा शुक्ला, शादाब कमल, राजेश शर्मा, दिब्येंदू भट्टाचार्य हे मुख्य भूमिकेत होते. आपल्या मालकिणीला खुश करण्यासाठी एका मुलाला काय काय करावे लागते हे या चित्रपटातून दाखविण्यात आले होते.

8. आस्‍था: इन द प्रिजन ऑफ स्प्रिंग - हा चित्रपट म्हणजे एक प्रकारचा इरॉटिक ड्रामा होता. त्याचे दिग्दर्शन बासु भट्टाचार्य यांनी केले होते. बोल्ड कंटेट म्हणून या चित्रपटाकडे पाहिले गेले आहे. रेखा, ओम पुरी, यांनी मुख्य भूमिका केली आहे. अॅडल्ट दृश्यांसाठी लोकप्रिय असणारा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यातील अनेक दृश्य़ांना कात्री लावण्यात आली होती. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood top hot movies viewers like most all time