Urfi Javed: अंग बाई उर्फी ! मोबाइल जपून वापर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed

Urfi Javed: अंग बाई उर्फी ! मोबाइल जपून वापर...

विचित्र फॅशन सेन्समूळे ओळखली जाणारी उर्फी जावेद ही कधी कोणती फॅशन करेल याचा काही भरोसा नाही. आपल्या चित्रविचित्र फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत आणि वादात असते. उर्फी जावेद आणि विचित्र फॅशन हे यमकच जुळलं आहे.

 उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. आता उर्फी जावेदने पुन्हा एकदा बोल्डनेसची हद्द पार केली आहे.

नुकताच उर्फीने एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये तिने दोन मोबाईलचा वापर करत फॅशन केली आहे. तिने दोन मोबाईलचा वापर करत तिचे ब्रेस्ट झाकले आहे. त्यासाठी तिने मोबाइल चार्जरच्या वायरचा वापर केला आहे. तिने तिचे स्तन लपवले आहे. त्यावर तिने ब्ल्यू कलरचं ब्लेझर आणि ब्ल्यू कलरची पॅन्ट घातली आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले " fully charged "

हेही वाचा: का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

 तिचा हा व्हिडिओ  सोशल मिडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. त्यातच या व्हिडिओमूळे ती खुप ट्रोलही होत आहे.  एका युजर्सने लिहिले "उर्फीला दुसऱ्या ग्रहावर पाठवा", "उर्फी तु फॅशनचा खुन केला आहेस" असं दुसऱ्याने लिहिलंय " उर्फी मोबाईलची फॅशन दाखवली आता चार्जर ची पण सांग" "आज मोबाईल तर उद्या लॅपटॉप पण येईल" " उर्फी तुला मोबाईल इतका भरोसा अग बाजूला गेला तर काय होईल "अशा अनेक कमेंट तिच्या व्हिडिओला येत आहेत एकाला तर उर्फीच्या फॅशन डिझायनरला भेटायचे आहे.

उर्फीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती आता पुन्हा एकदा टीव्हीवर धमाल करायला येत आहे. उर्फी जावेद एमटीव्हीच्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो स्प्लिट्सविलामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा: Big Boss 16: शिव ठाकरे स्वत: बिग बॉस बाहेर जाणार?