Vikram Gokhale: “गोखले साहेबांनी संकर्षणचं सक्रमणचं करुन टाकलं” संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत

Vikram Gokhale
Vikram GokhaleEsakal

आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, विक्रम गोखले यांच्या निधनानंतर फिल्म इंडस्ट्रीतुन त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांचे कधी न पाहिलेले फोटो आणि त्याच्या आठवणींना, त्याच्या सोबतचे किस्से शेअर करत त्यांना श्रद्धांजली देण्यात येत आहे.

यावरुन त्याचं इतरांसोबतच वागणं हिचं त्यांची खरी संपत्ती असल्याचं कळतं. लोकप्रिय मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यानेही विक्रम गोखले यांच्याबद्दलच्या त्याच्या आठवणी सोशल मिडियावर शेअर केला आहे. माझं जर पुढे अभिनय क्षेत्रात चांगलं काही झालं तर त्यात विक्रम गोखले यांचा मोठा वाटा असल्याचं त्यानं सांगितलं आहे.

Vikram Gokhale
Vikram Gokhale: 'मारूतीच्या पायाला आज पाणी लागलं’, विक्रम गोखलेंच्या 'गुरुभगिनी' नीना कुळकर्णी

त्याच्या आठवणींना उजाळा देत तो लिहितो, “आणि विक्रम गोखले साहेबांनी चक्कं मला रंग लावला हो ..” मी विक्रम गोखले सरांना “गोखले साहेब” असं म्हणतो.. आणि ते कधीच मला संकर्षण म्हणाले नाहीत.. “संक्रमण” म्हणायचे.. खोपा नावाच्या एका सिनेमात ते माझे आजोबा होते.. गुंडांसोबतच्या मारामारीत मला जबर जखम होते.. ती जखम दाखवण्यासाठी केलेला मेक अप त्यांना “खरा वाटत नव्हता..” ते म्हणाले, सगळ्यांना माहीती आहे.. सिनेमातली जखम खोटीच असते.. पण ती “खरी वाटली पाहिजे “ .. आणि त्यांनी स्वत: माझा मेक अप केला हो .. आरसा दाखवला..ह्याच सिनेमातली अजुन एक आठवण सांगतो ; काही सिन्स (scenes) त्यांना लिखाणात आवडले नव्हते .. म्हणुन मी ते rewrite केले . तर साहेबांनी vanity van मध्ये दिग्दर्शक आणि निर्मात्यांना बोलवून सांगीतलं कि , “ह्या मुलाला credits मध्ये विशेष सहाय्य म्हणुन नाव द्या अन्यथा त्याचे पैसे द्या ..”

Vikram Gokhale
Vikram Gokhale Death: मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा..सिनेतारकांनी वाहिली श्रद्धांजली

‘हि सगळी कित्ती थोर असल्याची लक्षणं आहेत.. कुठलाही कलाकार त्याच्या कला गुणांइतकाच त्याच्या सोबतच्या सिनियर्स मुळे घडतो.. माझं भविष्यात काही चांगलं झालं तर; त्यात
“गोखले साहेबांचा ही मोठ्ठा वाटा असेल .. “ साहेब .. आठवण येत राहील ..’ अशा शब्दात संकर्षण कऱ्हाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com