Bollywood Vs South Movie 2024 Amitabh Bachchan Rajnikanth
Bollywood Vs South Movie 2024 Amitabh Bachchan Rajnikanth

2024 Tamil Movie Released : दाक्षिणात्य चित्रपटांचं वादळ घोंघावणार, बॉलीवूडला करणार भुईसपाट!

भारतीय चित्रपट विश्वात बॉलीवूड Vs दाक्षिणात्य चित्रपट अशी तुलना नेहमीच होत असते.

Bollywood Vs South Movie 2024 Amitabh Bachchan Rajnikanth : भारतीय चित्रपट विश्वात बॉलीवूड Vs दाक्षिणात्य चित्रपट अशी तुलना नेहमीच होत असते. गेल्या काही वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर टॉलीवूडचा वरचष्मा राहिला आहे. यंदाच्या वर्षी भलेही शाहरुखच्या पठाण, जवाननं बाजी मारली असली तरी दाक्षिणात्य चित्रपटांकडे प्रेक्षकांचा ओढा वाढताना दिसतो आहे.

पुष्पा, केजीएफ, आरआरआर, मास्टर, केजीएफ २, लिओ, विक्रम सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांची तुफान लोकप्रियता मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यांनी बॉक्सऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. त्याच्या तुलनेत बॉलीवूड मागे आहे. यंदाच्या वर्षीही टॉलीवूडमधील कोणते चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत हे आपण पाहणार आहोत. त्यातील एका चित्रपटामध्ये बिग बी अमिताभ बच्चन हे थलायवा रजनीकांत यांच्यासोबत स्क्रिन शेयर करणार आहे.

२०२४ मध्ये साऊथचे जे चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणार आहेत आपण त्याविषयी माहिती घेऊयात. यात खास करुन तमिळ भाषेतील चित्रपटांची संख्या मोठी आहे. हिस्टोरिकल अॅक्शन ड्रामा म्हणून थंगालान नावाचा चित्रपट २६ जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यात अभिनेता विक्रम, पसुपति हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच पार्वती थिरुवोथू, मालविका मोहनन, डॅनियल कॅल्टागिरोन आणि हरिकृष्णनन अंबूदुरई हे सहायक भूमिकेत दिसणार आहेत.

दुसरी अॅक्शन ड्रामा मुव्ही कांगुवा ए मायटी वॅलिएंट सागा नावाची फिल्म येत्या वर्षात ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. त्या फिल्ममध्ये सूर्या हा लीड रोलमध्ये दिसणार आहे. त्यातून बॉबी देओल आणि दिशा पटानी तमिळ मुव्हीमध्ये डेब्यू करणार आहेत. मागीज थिरुमेनी यांचे डायरेक्शन असलेली विदा मुयार्ची नावाची मुव्ही देखील यंदाच्या वर्षातील प्रमुख आकर्षण असणार आहे. हा चित्रपट मे २०२४ मध्ये दिसणार आहे. त्यात अजित कुमार, अर्जुन सरजा, त्रिशा, रेजिना यांच्या भूमिका आहेत.

प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक कमल हासन यांचा इंडियन २ नावाचा चित्रपट यंदाच्या वर्षातील प्रमुख आकर्षण असणार आहे. तो १५ ऑगस्टमध्ये दिसणार आहे. १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या इंडियन नावाच्या चित्रपटाचा हा पुढील भाग असणार आहे. अरुण माथेश्वरन यांची प्रमुख भूमिका असलेला कॅप्टन मिलर नावाचा चित्रपटही या वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्यात धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम नावाच्या चित्रपटामधून वेकंट प्रभू चाहत्यांना आगळी वेगळी ट्रीट देणार आहेत, त्यात थलापती विजय हा वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्यानं त्याची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. याशिवाय बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा विदुथुलाईचा दुसरा भाग यावेळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यात थलापती विजय मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

विदुथुलाईच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासुन चाहते त्याच्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. याच वर्षी टी जे ज्ञानवेल यांचा वेट्टाइया नावाचा चित्रपटही प्रदर्शित होणार असून त्यामध्ये थलायवा रजनीकांत आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com