Bollywood Vs Tollywood: 24 चित्रपट होणार प्रदर्शित, कोण होणार सुपरहिट? |Bollywood Vs Tollywood box office this week released 24 movies | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Vs Tollywood

Bollywood Vs Tollywood: 24 चित्रपट होणार प्रदर्शित, कोण होणार सुपरहिट?

Bollywood Vs Tollywood Movies: बॉलीवूडला अजुनही मोठ्या यशाची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीपासून बॉलीवूडला ग्रँड सक्सेस मिळवून देणारा चित्रपट आलेला नाही. आतापर्यत भल्या भल्या बॉलीवूडच्या कलाकारांना टॉलीवूडनं चांगलाच (Tollywood Movies) दणका दिला आहे. त्यांना जेरीस आणलं आहे. त्यामुळे येत्या काळात देखील बॉलीवूडचा दिमाखदार कामगिरीचे आव्हान असणार आहे. सध्या (Entertainment News) बॉयकॉट बॉलीवूड असा ट्रेंड सुरु झाला आहे. आमिर (Aamir Khan) खानच्या लाल सिंग चढ्ढावर मोठी बंधनं आली आहेत. काही केल्या तो चित्रपट पाहायचाच नाही अशी भूमिका नेटकऱ्यांनी घेतली आहे. याचा फटका (Laal Singh Chaddha) आगामी काही चित्रपटांना बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या आठवडय़ात एक दोन नव्हे तर तब्बल 24 चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या आठवड्यात विजय देवराकोंडाचा लायगर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात विजयच्या जोडीला अनन्या पांडे दिसणार आहे. लायगर 24 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अन्य भाषांमध्ये प्रदर्शित होणारा चित्रपट 25 ऑगस्टला प्रदर्शित होईल. 26 ऑगस्टला संजय मिश्र यांची भूमिका असलेला होली काओ हा प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Bollywood Vs Tollywood

Bollywood Vs Tollywood

चार मल्याळम चित्रपट प्रदर्शित होणार आहे. क्राईम, ड्रामा, थ्रिलर या जॉनरमधील चित्रपटांची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. त्यात 25 ऑगस्टला कुकडूकू आणि थीरप्पउ तर पीस आणि कदल कुथीरा हे 26 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. हॉलीवूडचे दोन चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत. त्यात द इन्विटेशन आणि थ्री थाउजंड्स इयर्स ऑफ लॉगिंग अशी त्या चित्रपटांची नावं आहेत.

Bollywood Vs Tollywood, hollywood

Bollywood Vs Tollywood, hollywood

तेलुगू भाषेत पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यात भला छोरा भला, न्यु कलिंगपटनस जीव, कालापुरम आणि पीके या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. तर तमिळमध्ये डायरी नावाचा चित्रपट 26 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल. मराठीमध्ये दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यात दोन ब्लॉगर्सची गोष्ट समायरामधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तर विक्रम गोखले यांची प्रमुख भूमिका असलेला राष्ट्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय आहे.

Bollywood Vs Tollywood

Bollywood Vs Tollywood

Bollywood Vs Tollywood, hollywood and Marathi movies

Bollywood Vs Tollywood, hollywood and Marathi movies

कन्नड भाषेतील चार भन्नाट चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यात तीन चित्रपट हे ड्रामा या जॉनरची आहेत. 26 ऑगस्टला कौटिल्या आणि शिवा 143, विक्की पिडीया आणि डोलू नावाचे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बंगाली चित्रपट विश्वाविषयी सांगायचे झाल्यास, 25 ऑगस्टला कोलकाता चलंतिका नावाची फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 26 ऑगस्टला लोकखी छेले नावाचा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Bollywood Vs Tollywood

Bollywood Vs Tollywood

Web Title: Bollywood Vs Tollywood Box Office This Week Released 24 Movies Vijay Deverakonda Liger

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..