Salman Khan News : सलमान खानला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा! नेमकं काय आहे प्रकरण?

Bombay High Court quashed complaint against  Salman Khan
Bombay High Court quashed complaint against Salman Khanesakal

मुंबई : बॉलिवुड अभिनेता सलमान खान आणि त्याचा अंगरक्षकाने पत्रकाराशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात आज (३० मार्च) मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकांविरोधातील पत्रकाराचा फोन हिसकावल्याचा आणि गैरवर्तन केल्याचा खटला रद्द केला आहे.

नेमकं प्रकरण आहे काय?

हे संपूर्ण प्रकरण हे २०१९ सालचे असून मुंबईच्या अंधेरी परिसरात सायकल चालवत असताना एका कथित पत्रकाराने सलमान खानचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर सलमानच्या अंगरक्षकाने त्याला हटकलं तेव्हा त्या पत्रकाराने त्यांच्याशी हु्ज्जत घालायला सुरूवात केली. त्यावेळी सलमान आणि त्याच्या अंगरक्षकांनी आपल्याला शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की करत आपला फोन हिसकावून घेतल्याची तक्रार या पत्रकाराने केली .

Bombay High Court quashed complaint against  Salman Khan
Corona Update : कोरोना पुन्हा वाढतोय! देशात आढळले मागील ६ महिन्यातील सर्वाधिक रुग्ण

सलमानला मोठा दिलासा..

या प्रकरणात अशोक पांडे या पत्रकाराने अंधेरीच्या डीएन नगर पोलिसस्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहचलं. अंधेरी कोर्टाने समन्स जारी करत सलमानला कोर्टात उपस्थित राहण्यासाठी बोलवलं. यानंतर सलमान खानने मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या या दोन्ही याचिकांवर स्वतंत्र्य सुनावणी झाली आणि या दोन्ही याचिका स्विकारत हायकोर्टाने हे सगळं प्रकरण रद्द केलं आहे.

त्यामुळे अंधेरी कोर्टातील याचिका आणि सलमानला बजावण्यात आलेलं समन्स रद्द करण्यात आलं आहे. यामुळे सलमान खान आणि त्याच्या सुरक्षारक्षकाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Bombay High Court quashed complaint against  Salman Khan
Bholaa BO Prediction: भोला पठाणचा रेकॉर्ड मोडू शकेल का? जाणून घ्या पहिल्या दिवशी किती होईल कमाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com