esakal | बाँडपट ओटीटीवर झळकणार?
sakal

बोलून बातमी शोधा

No-Time-to-die

नो टाईम टू डाय हा रौप्य महोत्सवी बाँडपट ओटीटीच्या माध्यमातून झळकण्याचे वृत्त हॉलिवुडविषयक संकेतस्थळांनी दिले आहे. मेट्रो गोल्डवीन मेयर अर्थात एमजीएम स्टुडीओने मात्र याचा इन्कार केला आहे. व्हरायटी या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.

बाँडपट ओटीटीवर झळकणार?

sakal_logo
By
यूएनआय

लास वेगास, नेवाडा - नो टाईम टू डाय हा रौप्य महोत्सवी बाँडपट ओटीटीच्या माध्यमातून झळकण्याचे वृत्त हॉलिवुडविषयक संकेतस्थळांनी दिले आहे. मेट्रो गोल्डवीन मेयर अर्थात एमजीएम स्टुडीओने मात्र याचा इन्कार केला आहे. व्हरायटी या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यानुसार ओटीटी कंपन्यांकडे एमजीएमने 60 अब्ज डॉलर इतकी रक्कम मागितल्याचे समजते. मूळ नियोजनानुसार हा चित्रपट यंदा एप्रिलमध्ये झळकणार होता, पण सुरुवातीला नोव्हेंबरपर्यंत मुहूर्त लांबणीवर टाकण्यात आला. आता अनेक देशांत चित्रपटगृह सुरू झाली असली तरी अनेक प्रमुख साखळी चित्रपटगृहे बंद आहेत. सध्याची स्थिती व्यवसायावर प्रतिकूल परिणाम करणारी असल्यामुळे एमजीएमने पुढील वर्षी दोन एप्रिल ही तारीख नक्की केली आहे. प्रदर्शन वर्षभर लांबणीवर पडल्यामुळे एमजीएम स्टुडीओला तीन कोटी ते पाच कोटी डॉलरचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते.  या पार्श्वभूमीवर अॅपल, नेटफ्लीक्स आणि इतर कंपन्यांनी डिजीटल हक्क मिळवण्याची चाचपणी सुरू केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निर्मितीवरील खर्च 25 कोटी डॉलर इतका असलेल्या या बाँडपटाची ओटीटीसाठीची किंमतही प्रचंड आहे. एमजीएमच्या प्रवक्त्याने मात्र काहीही झाले तरी चित्रपटगृहामध्येच प्रदर्शन करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. स्टुडिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही अफवांवर प्रतिक्रिया देत नाही. हा चित्रपट विक्रीसाठी उपलब्ध नाही. सिनेरसिकांची चित्रपटगृहात कलाकृतीची अनुभूती घेण्याची संधी जतन करण्यासाठीच आम्ही एप्रिल 2021 पर्यंत प्रदर्शन पुढे ढकलले आहे.

कोरोनाच्या जागतिक साथीच्या काळात पॅरामाऊंट, सोनी अशा स्टुडीओंना आगामी चित्रपटांच्या स्ट्रिमिंग सेवेच्या विक्रीतून लाखो डॉलरची कमाई झाली. त्यामुळे अॅपल, नेटफ्लीक्स आणि इतर कंपन्या उत्सुक असल्याचे समजते. या चित्रपटाच्या परदेशातील वितरणाचे हक्क युनीव्हर्सल पिक्चर्सकडे आहेत. त्यामुळे कोणताही करार अथवा व्यवहार झाल्यास या कंपनीला भरपाई तसेच काही कारणांमुळे खर्च झाला असल्यास तो सुद्धा  द्यावा लागेल.

उत्सुकता पुढील बाँडची
ब्रिटिश अभिनेता डॅनिएल क्रेग या चित्रपटाद्वारे जेम्स बाँडच्या व्यक्तीरेखेला अलविदा करणार आहे. त्याचा हा पाचवा आणि अखेरचा बाँडपट आहे. जेम्स बाँडची भूमिका यापूर्वी काही दिग्गज अभिनेत्यांनी साकारली असली तरी डॅनिएल क्रेग याने आपला स्वतःचा ठसा निर्माण केला आहे. त्यानंतर जेम्स बाँड कोण बनणार याविषयी जगभरातील चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

Edited By - Prashant Patil