"दंगल'मुळे "बुक माय शो'वर दंगल

वृत्तसंस्था
शनिवार, 24 डिसेंबर 2016

आमीर खानचा बहुचर्चित चित्रपट दंगल प्रदर्शित झाल्यानंतर ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांची झुंबड उडाली. तुम्ही जर आज ऑनलाइन बुकिंग करून जाणार असाल तर जरा सांभाळून. कारण वीकएन्डमुळे भारतभर या चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग सुरू आहे.

या ऍडव्हान्स बुकिंगसाठी लागणाऱ्या विविध संकेतस्थळांपैकी "बुक माय शो हे' लोकप्रिय संकेतस्थळ काही काळ बंद पडले होते. हे संकेतस्थळावर गेल्यावर एक एरर साधारणपणे तासभर दिसत होता. एकाच चित्रपटासाठी प्रचंड बुकिंग्ज होत असताना या संकेतस्थळाच्या सर्व्हर लोड आल्याने त्यावर एक एरर येत होता. सध्या हे संकेतस्थळ पुन्हा व्यवस्थित कार्यान्वित झाले आहे.

या अडचणीमुळे आमीर खानच्या चाहत्यांना मात्र आज एका वेगळ्यास समस्येला तोंड द्यावे लागले. "बुक माय शो' हे संकेतस्थळ लाइव्ह कॉन्सर्टस, चित्रपट तिकिटांसाठी सर्वाधिक वापरली जाणारी आहे.

Web Title: BookMyShow.com temporarily crashed: Is Aamir Khan's Dangal the reason?

टॅग्स