
Pathaan: 'काही काळानंतर कपड्यांशिवाय'; दिपिकाच्या भगव्या बिकीनी वादात शक्तीमानची उडी
सध्या मनोरंजन विश्वात चर्चा सुरु आहे ते फक्त शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'पठाण' चित्रपटाची... . भाजपपासून विश्व हिंदू परिषदेपर्यंत इतकच नव्हे तर मुस्लिम संघटना आणि अनेक इतर संघटनांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिकाच्या भगव्या बिकिनीबद्दलही अनेक स्टार्सनी विरोध दर्शवला आहे. आता त्यातच शक्तीमान अभिनेता मुकेश खन्ना याने गाण्याचे बोल आणि दीपिकाच्या ड्रेसवर आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये
'बेशरम रंग' या गाण्यात दीपिकाच्या भगव्या कलरच्या बिकिनीमुळे हा सर्व गोंधळ सुरू झाला होता, नंतर गाण्याच्या बोलांवरून विरोध होत आहे. भगवा रंग श्रद्धेचे प्रतीक असल्याचे हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे या रंगाची बिकिनी घालून 'बेशरम रंग'वर नाचणे योग्य नाही.
हेही वाचा: Pathaan: हिंदूंच झालं.. आता मुस्लिम भडकले.. दीपिकाच्या बिकिनीच काही खरं नाही..
त्यातच आता अभिनेता मुकेश खन्ना यांनी 'पठाण' चित्रपटातील गाणे अश्लील असल्याचं म्हटलं आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले, 'आजची मुलं टीव्ही आणि चित्रपट बघत मोठी होत आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने अशी गाणी पास करू नयेत. मुकेश खन्ना यांनीही या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, 'सेन्सॉर बोर्ड हे सर्वोच्च न्यायालय नाही, ज्याचा विरोध केला जाऊ नये'.
मुकेश खन्ना सांगतात की, असे सिनेमे आणि गाणी पाहण्याचा तरुणांवर वाईट परिणाम होतो. ते म्हणतात की, 'आपला देश स्पेन झाला नाही, जिथे अशी गाणी आणता येतील. सध्या अर्ध्या कपड्यांमध्येच गाणी तयार केली जात आहेत आणि काही काळानंतर कपड्यांशिवाय गाणी येऊ लागतील. सेन्सॉर बोर्ड असे गाणे का पास करते हे समजत नाही"
हेही वाचा: Boycott Pathaan: "दिपिकाची भगवी बिकीनी सहन करणार नाही",मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा भडकले...
त्याचवेळी मुकेश खन्ना यांनी असेही म्हटले की, 'निर्मात्याला हे माहित नाही का की भगवा रंग धर्म आणि समुदायाशी संबंधित आहे आणि त्या लोकांसाठी त्याचा खूप अर्थ आहे, अमेरिकेत तुम्ही त्यांच्या ध्वजाची बिकिनी घालू शकता, पण भारतात असे करू शकत नाही.