शाहरुख-दिपिकाचा 'बेशरम रंग' पाहून नेटकरी भडकले; बॉयकॉट ट्रेन्ड सुरु : Boycott Pathaan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dipika Padukone_Shah Rukh Khan_Pathan

Boycott Pathaan: शाहरुख-दिपिकाचा 'बेशरम रंग' पाहून नेटकरी भडकले; बॉयकॉट ट्रेन्ड सुरु

Boycott Pathaan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दिपिका पादुकोन यांच्या पठाण या आगामी सिनेमातील बेशरम रंग नावाचं गाणं नुकतंच युट्यूबर प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातील दिपिका आणि शाहरुखची केमिट्री नेटकऱ्यांना खूपच आवडली आहे. पण त्याचबरोबर पठाण सिनेमावर बहिष्काराचा ट्रेन्डही सुरु झाला आहे. (Boycott Pathaan trends on Twitter after netizens object to SRK Deepikas Besharam Rang)

ट्विटरवर हा पठाण बॉयकॉन्ट ट्रेन्ड सुरु झाला असून यामध्ये अनेक युजर्सनी बॉलिवूडला झोडपून काढलं आहे. बॉलिवूडमध्ये नव्या कल्पनांची दिवाळखोरी झाली आहे का? असे सवाल काहींनी विचारले आहेत. तर अनेकांनी यंदाच्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'कांतारा' या सिनेमाशी 'पठाण' सिनेमातील बेशरम रंग गाण्याची तुलना केली आहे.

ट्विटरवर सुरु झाला 'बॉयकॉट पठाण' ट्रेन्ड

नेटिझन्समधील एका गटानं ट्विटरवर बॉयकॉट पठाण हा ट्रेन्ड सुरु केला आहे. अनेकांनी 'बेशरम रंग' या गाण्यातील एक विशिष्ट सीनचा स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या सीनमध्ये दिपिकानं कथीत भगव्या रंगाची बिकीनी परिधान केलेली असून शाहरुखनं तिला मागच्या बाजूनं पकडलेलं आहे.

पठाण सिनेमा कसा आहे?

शाहरुख खान आणि दिपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला पठाण हा सिनेमा २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये जॉन अब्राहिम देखील महत्वाच्या भुमिकेत आहे. सिद्धार्थ आनंद यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात जबरदस्त अॅक्शन सीन्स आहेत. या सिनेमात सलमान खान देखील विशेष भूमिकेत दिसणार आहे.