Ayan Mukerji: ब्रम्हास्त्रचा दिग्दर्शक रडला! 'दहा वर्षे मेहनत घेतली आणि...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ayan Mukerji

Ayan Mukerji: ब्रम्हास्त्रचा दिग्दर्शक रडला! 'दहा वर्षे मेहनत घेतली आणि...'

Bramhastra Movie: सोशल मीडियावर ब्रम्हास्त्रला अनेकांनी ट्रोल केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडचे चित्रपट आवडीनं पाहणाऱ्यांचा मूड (viral news) बदलल्याचे दिसून आले आहे. बॉयकॉट बॉलीवूड ट्रेंडनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा मोठा फटका निर्माते आणि दिग्दर्शकांना बसला आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रची प्रेक्षक ही गेल्या काही वर्षांपासून वाट पाहत होते. रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन अशी मोठी स्टार कास्ट असलेल्या या (Bollywood movies news) चित्रपटावर बहिष्काराची मागणी केली जात आहे. यासगळ्यात दिग्दर्शक अयान मुखर्जी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वी ब्रम्हास्त्र प्रदर्शित झाला. त्याला मोठा प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका करुन ब्रम्हास्त्राविरोधात नकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. रणबीरनं त्याच्या रॉकस्टार चित्रपटाच्या दरम्यान आपल्याला बीफ खायला आवडते असे म्हटले होते. त्याची ती व्हिडिओ क्लिप आता व्हायरल करुन त्याचा संबंध हा ब्रम्हास्त्रशी जोडला जात आहे. याचा परिणाम ब्रम्हास्त्रवर होताना दिसत आहे. असे असले तरी प्रेक्षक आवडीनं हा चित्रपट पाहण्यास जात आहे. बॉक्स ऑफिसवर त्यानं चांगली कमाईही केली आहे.

अयान मुखर्जी यांच्या ब्रम्हास्त्रचे खास स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. त्याला अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि चित्रपटाशी संबंधित अनेक लोकं उपस्थित होती. चित्रपट संपल्यानंतर अयान यांनी प्रेक्षकांशी संवादही साधला. यावेळी ते कमालीचे भावूक झाल्याचे दिसून आले आहे. लोकांना आम्हाला ट्रोल करायला आवडते. ते फार सहजपणे ट्रोलही करतात. मात्र त्यामागील त्या दिग्दर्शक, कलाकार यांची मेहनत कुणीही लक्षात घ्यायला तयार नसते. ब्रम्हास्त्रला ट्रोल केले जाते हे पाहून मला वाईट वाटते. बरं त्यामागील कारणही काही लॉजिकल नाही, लोकं कशावरुनही ट्रोल करतात हे पाहून काय बोलावं मला कळत नाही.

हेही वाचा: Bramhastra: सुशांतचं 'ब्रम्हास्र' बॉलीवूडला करेल भस्म, बहिण मीतूची जळजळीत प्रतिक्रिया

त्या स्क्रिनिंग दरम्यान अयान मुखर्जी हे भावूक झाल्याचे दिसून आले आहे. त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत अभ्यासूपणे उत्तरं दिली आहेत. मी गेल्या दहा वर्षांपासून या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी आहे. त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ब्रम्हास्त्र तयार करण्यासाठीचा संघर्ष मोठा आहे. हा चित्रपट तयार करण्याच्या निमित्तानं मी इतका पॅशिनेट होतो की, मला त्याशिवाय दुसरे काही सुचतही नव्हते. माझ्या करिअरमधील ही खूप मोठी फिल्म आहे. जी तीन पार्टमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: Kunal Kamra: 'चार चवन्नी घोडे पे, तुम्हारा गोडसे...' कुणाल कामराचं वादग्रस्त ट्विट

Web Title: Bramhastra Director Ayan Mukerji Crying Tears Happiness First Show Ranbir Kapoor Attend Viral News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..