'सडक २' वादात, आलिया आणि महेश भट्ट यांच्याविरोधात गुन्हा दाखल

sadak 2
sadak 2

मुंबई- महेश भट्ट यांच्या १९९० मध्ये रिलीज झालेल्या 'सडक' या हिट सिनेमाचा 'सडक २' हा सिक्वेल रिलीजसाठी सज्ज आहे. चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल दोन दशकांनंतर महेश भट्ट दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. विशेष म्हणजे मुलगी आलियासोबत ते पहिल्यांदा या सिनेमाच्या निमित्ताने काम करत आहेत. मात्र सिनेमा रिलीज होण्याआधीच वादाच्या भोव-यात अडकला आहे.

काही दिवसांपूर्वी 'सडक २' या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. तसंच एका ऑनलाईन पत्रकार परिषदेतून हा सिनेमा डिजीटलवर रिलीज करणार असल्याची घोषणाही केली गेली होती.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सिकंदरपुरचे रहिवासी आचार्य चंद्र किशोर पराशर यांनी त्यांचे वकिल सोनू कुमार यांच्याद्वारे आलिया भट्ट, महेश भट्ट आणि निर्माते मुकेश भट्ट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, मुख्य न्यायदंडाधिकारी मुकेश कुमार यांनी या प्रकरणाची सुनावणी ८ जुलै रोजी होणार असल्याचे  स्पष्ट केलं आहे. भादवि कलम २९५ ए (जाणीवपूर्वक धार्मिक भावनांना दुखावणे)  आणि १२० बी (गुन्हेगारी कट) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारकर्त्याने सिनेमाच्या पोस्टरमध्ये कैलास मानसरोवरचा फोटो वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचं कळतंय.

आलियाने जेव्हा हे पोस्टर ऑनलाईन रिलीज केलं गेलं तेव्हा कैलास मानसरोवरचा फोटो पोस्टरमध्ये का वापरला आहे याचं कारण सांगितलं होतं. ती म्हणाली होती, 'कैलास पर्वत हे देवता आणि ऋषी मुनींच पदचिन्ह असल्याचं म्हटलं होतं. हे देवांचे देव महादेव शंकर यांचं निवासस्थान आहे. तेव्हा आपल्याला खरंच कोणत्या दुस-या गोष्टीची किंवा एवढ्या पवित्र स्थानावर कलाकारांच्या फोटोची आवश्यकता आहे का? सुरुवातीपासूनंच मानवांनी कैलास पर्वताला आपलं आश्रय मानलं आहे. ही अशी एक जागा आहे जिथे सर्व प्रकारचा शोध संपतो. 'सडक २' हा प्रेमाचा मार्ग आहे. हा सिक्वेल तुम्हाला सगळ्या तिर्थांच्या आईपर्यंत नेऊन पोहोचवेल.'   

case filed against alia bhatt mahesh bhatt for using kailash mansarovar photo in sadak 2 poster  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com