सेलिब्रिटी विकएण्ड : मित्रांशी गप्पा आणि मनसोक्त खादाडी 

सेलिब्रिटी विकएण्ड : मित्रांशी गप्पा आणि मनसोक्त खादाडी 

अभिनेता आरोह वेलणकरने ‘रेगे’ या चित्रपटाद्वारे रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यानंतर तो ‘घंटा’ या चित्रपटातही चमकला. कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात तो कमालीचा भाव खाऊन गेला. टीव्हीवरील या शोमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. चित्रपट आणि टीव्ही अशी दमदार वाटचाल त्याने सुरू केली. आपल्या वीकएण्डबद्दल तो म्हणाला, ‘‘आम्हा कलाकारांना वीकएण्ड असा काही नसतो. सतत काम आणि काम. ज्या दिवशी शूटिंग नसते, तोच आमचा वीकएण्ड. आम्हाला शनिवार, रविवार, सोमवार हे सगळेच वार सारखेच असतात. मी कलेबरोबरच सोशल वर्कदेखील करतो. वडिलांना त्यांच्या बिझनेसमध्ये मदत करतो. माझ्या मते एक पूर्ण वीक असतो आणि नंतर वीकएण्ड असतो. मी मुळचा पुण्याचा असल्याने माझा वीकएण्ड शक्यतो पुण्यातच असतो. मी वीकएण्ड शक्यतो घरी राहणे अधिक पसंत करतो. माझ्या घरी दोन कुत्री आहेत. त्यांना फिरायला घेऊन जाणे, त्यांच्याबरोबर खेळणे, त्यांचे लाड करणे या गोष्टी मी सुट्टीच्या दिवशी करतो. पुण्याला माझी काही मित्रमंडळी आहेत. 

माझ्या शाळेतल्या आणि कॉलेजमधील मित्रांचा वेगळा. आर्ट सर्कलमधील मित्रांना भेटल्यावर कॉलेजच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारणे, कॉलेजच्या कॅटिनमध्ये जाऊन खाणे सुरू असते. काही जुन्या गोष्टींना उजाळा देणे, कधी चित्रपट पाहायला जाणे हा आमचा बेत असतो. शाळेतील मित्र भेटले की, गणेश भेळ, मनीषा भेळ या आवडीच्या ठिकाणी जाऊन खादाडी करणे आणि शाळेतील आठवणी ताज्या करणे, नाक्यावर बसणे या गोष्टी करतो. अनेकदा सगळ्यांना एकत्र येत नाही, मग आम्ही कुणा एकाच्या घरी जमतो. आमच्यातील अनेकांना फुटबॉलची आवड असल्याने फुटबॉलची मॅच पाहण्याचा आमचा प्लॅन असतो. मी अधिक काळ मुंबईत राहतो, मात्र पुण्यात आल्यावर आईच्या हातचे जेवण घेतो. सिंहगड रोडला आमचे छोटेसे एक फॉर्महाऊस आहे, तेथे पत्नी आणि मी फिरायला जातो. आम्ही तेथे ऑरगॅनिक फार्मिंगचे प्रयोग करतो. माझ्या घरातील मोठ्या स्क्रीनवर मी अनेक क्लासिकल सिनेमे पाहतो. यात हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेतील अनेक चित्रपट असतात. विविध गेम्स खेळण्यात माझा बराचसा वेळ निघून जातो. मला घरी राहूनच अनेक उद्योग करायला आवडते. मी दररोज जीमला जातो व वीकएण्डलाही त्याबाबतीत कधी कंटाळा करीत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com