
ज्या दिवशी सुट्टी असते, तो दिवस मला शक्यतो घरीच राहून, आराम करून, घरातली चार कामं करून सत्कारणी लावायला आवडतो. सुट्टीचा दिवस आहे म्हणून उशिरा उठणं मला आवडत नाही. आदल्या दिवशी शूटिंगवरून घरी यायला उशीर झाला असला, तरी त्या दिवशीसुद्धा मी रोज जसं लवकर उठतो तसाच उठतो. रोज सकाळी गरम पाणी पिणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर मी करत आलेली गोष्ट म्हणजे गरम पाणी पिणं. त्यानंतर सकाळचा कमीत कमी अर्धा तास तरी व्यायाम करणं, हे माझं ठरलेलं रुटीन असतं.
ते झाल्यावर छान पोटभर नाश्ता करून मग आपल्याला हवा तसा दिवस घालवायचा. सगळं आवरून झालं, की मी बाहेरून काही सामान आणायचं असेल, बाहेरची काही कामं असतील ती करायला बाहेर पडतो. घरातली काही साफसफाई असेल, आवराआवर असेल, ती मी या दिवशी करतो. मला वाचन करायला आवडतं. हल्ली कामांमुळे वाचन थोडंसं कमी झालं आहे; परंतु रोज सेटवरसुद्धा माझ्याबरोबर मी एखादं पुस्तक ठेवतो. म्हणून सुट्टीच्या दिवशी मुद्दाम वाचनासाठी वेळ काढावा लागतोय असं होत नाही.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मला आधीपासूनच थोडा फार स्वयंपाक करता यायचा; पण जसे अनेक जण लॉकडाऊनच्या काळात वेगवेगळे पदार्थ करायला शिकली तसाच मीही काही नवीन पदार्थ करायला शिकलो. आता घरी असल्यावर मी विविध पाककृती बनवत असतो. ते करणं मी फार एन्जॉय करतो. आमच्या घरी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. त्यांची निगा राखणं, त्यांना पाणी घालणं हे करायला मी घरी असल्यावर थोडा वेळ देतो. ते करत असताना वेळ कसा जातो हे कळतच नाही. यासोबतच काही वेळ हा वेब सिरीज बघण्यात जातो. मला सुट्टी असल्यावर मी आणि माझी पत्नी घरी आवर्जून एखादा चित्रपट बघतोच.
दोन-तीन दिवस जर लागून सुट्टी असली, तर माझं आवडतं फिरण्याचं ठिकाण म्हणजे कोकण. तसेच, मला संध्याकाळच्या वेळी फिरायला जायलाही आवडतं; परंतु सध्याची परिस्थिती बघता तसं कामाव्यतिरिक्त बाहेर पडणं होत नाही. असा संपूर्ण दिवस गेल्यावर दुसऱ्या दिवशी शूटिंगला जाण्याची सगळी तयारी करून मी माझ्या सुट्टीच्या दिवसाची सांगता करतो.
(शब्दांकन - राजसी वैद्य)
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.