अमर फोटो स्टुडिओची शंभरी

टीम ई सकाळ
शनिवार, 27 मे 2017

कलाकारखाना प्रस्तुत 'अमर फोटो स्टुडीओ' या नाट्यकृतीने रसिकांची मने जिंकली आहेत. मनोरंजनाची फूल ऑन मेजवानी घेऊन आलेल्या अमर फोटो स्टुडीओ या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग 28 मे ला दुपारी 4 वाजता यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे रंगणार आहे.

मुंबई : सुबक ने नेहमीच प्रेक्षकांच्या अभिरुचीचा विचार करत अनेक चांगल्या नाट्यकृती रसिकांना दिल्या आहेत. सुबकच्या सहकार्याने रंगभूमीवर दाखल झालेल्या कलाकारखाना प्रस्तुत 'अमर फोटो स्टुडीओ' या नाट्यकृतीने रसिकांची मने जिंकली आहेत. मनोरंजनाची फूल ऑन मेजवानी घेऊन आलेल्या अमर फोटो स्टुडीओ या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग 28 मे ला दुपारी 4 वाजता यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे रंगणार आहे. या नाटकाने यंदा महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा तसेच झी गौरव पुरस्कारांवरही आपली ठसठशीत मोहोर उमटवली आहे. 

तरूणाईची अचूक नस ओळखणाऱ्या दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी व लेखिका मनस्विनी लता रविंद्र यांनी तरुणाईचा सुरेख कॅलिडोस्कोप या नाटकात मांडला आहे. अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, सिद्धेश पुरकर, पूजा ठोंबरे हे कलाकार आहेत. नाटकाच्या प्रसिद्धीपासून ते प्रयोगापर्यंत सर्वच बाबतीत आपले वेगळेपण जपणाऱ्या या नाटकाच्या यशात अभिनेता सुनील बर्वे यांचा मोलाचा वाटा आहे. 

Web Title: Century of drama Amar photo studio