'चाहूल'मध्ये येणार आता ऩवे वळण; मालिकेचे 200 भाग पूर्ण

टीम ई सकाळ
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

चाहूल मालिकेतील निर्मालाचे सर्जावरील प्रेम, तिचा त्याला मिळवण्यासाठीचा अट्टाहास, तसेच तिने त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीला त्याच्यापासून दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न या सगळ्यांनीच प्रेक्षकांना जवळजवळ एक वर्ष खिळवून ठेवले. रसिक प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दिली तसेच त्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील चाहूल मालिकेने २०० भागांचा पल्ला गाठला. या निमित्तानेच मालिकेत आता नवे वळण येणार आहे. विशेष म्हणजे आता निर्मला मालिकेत एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांना दिसणार आहे.

मुंबई : चाहूल मालिकेतील निर्मालाचे सर्जावरील प्रेम, तिचा त्याला मिळवण्यासाठीचा अट्टाहास, तसेच तिने त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीला त्याच्यापासून दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न या सगळ्यांनीच प्रेक्षकांना जवळजवळ एक वर्ष खिळवून ठेवले. रसिक प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दिली तसेच त्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील चाहूल मालिकेने २०० भागांचा पल्ला गाठला. या निमित्तानेच मालिकेत आता नवे वळण येणार आहे. विशेष म्हणजे आता निर्मला मालिकेत एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांना दिसणार आहे.

आता निर्मला भोसल्यांच्या मार्गावर तर होतीच आणि त्यांचा मागोवा घेत ती थेट त्यांच्या नव्या वाड्यावर देखील पोहचली, वा सर्जाच्या प्रेमामुळे ती तिथे गेली असे म्हणण वावगं ठरणार नाही. निर्मलाने बाहुलीच्या मदतीने भोसले वाड्यात जाण्याचा प्रयत्न केला आणि तीला त्यामध्ये यश देखील आले. पण, शांभवीला निर्मलाच्या या सगळ्या कारस्थानांचा सुगावा लागताच ती पुन्हा एकदा वाड्यामध्ये परतली आणि तिने निर्मलाच्या या खेळीला उलटून लावले. पण आता निर्मला बाहुलीमधून मुक्त झाली आहे आणि ती वाड्यामध्ये परतण्याचा प्रयत्न करत आहे. पण शांभवी आता परत तिच्या मार्गामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. निर्मला कशी वाड्यामध्ये पुन्हा जाईल ? ती भोसलेंना कसा त्रास देईल ? कशी सर्जाला मिळवेल हे बघणे रंजक असणार आहे.

शांभवी निर्मलाच्या या कारस्थानांना आणि खेळीमुळे खूपच चिडली असून ती आता निर्मलाचे  प्रत्येक वार उलटून लावते आहे. सर्जाला गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या स्वप्नांचा आणि निर्मलाचा काहीतरी संबंध आहे अशी शंका शांभवीच्या मनात आली आहे, त्यामुळे ती आता शोधात आहे कि, यामागे नक्की कोणाचा हात आहे.

Web Title: Chahul 200 episods colours marathi esakal news