श्रेया बुगडेचे फोटो पाहून स्वप्निल जोशी म्हणाला, मी तुला ब्लाॅक करतो ! | Shreya Bugade And Swapnil Joshi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swapnil Joshi And Shreya Bugde

श्रेया बुगडेचे फोटो पाहून स्वप्निल जोशी म्हणाला, मी तुला ब्लाॅक करतो !

'चला हवा येऊ द्या' या विनोदी मालिकेतून अभिनेत्री श्रेया बुगडे हिला लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेत कोणत्याही पात्राची नक्कल ती हुबेहुब करते. यातून ती प्रेक्षकांना हसवून त्यांचे मनोरंजन करत असते. मालिकेबरोबरच ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. या व्यासपीठावर ती आपले वेगवेगळे फोटो शेअर करत असते. सध्या श्रेया बुगडे (shreya bugde) गोव्याला फिरायला गेली आहे. येथील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. (chala hawa yeu dya shreya bugde share photos swapnil joshi reaction)

हेही वाचा: Y Film : 'वाय'च्या स्क्रिनिंगसाठी मुक्ती अन् प्राजक्ता हरियाणात

आता समुद्री किनाऱ्यावरील तिचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. त्याला बऱ्याच जणांनी लाईक्सबरोबर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यात गोव्यातील खाद्यपदार्थ खातानाचे फोटोही आहेत. ती पाहून अभिनेता स्वप्निल जोशीलाही (swapnil joshi) प्रतिक्रिया द्यावीशी वाटली आहे. तो म्हणतो, तू गोव्यात असेपर्यंत मी तुला ब्लाॅक करत आहे. (chala hawa yeu dya)

हेही वाचा: Sanjay Raut : पैसे खाल्ले का नाही? आरोह वेलणकरचा संजय राऊतांना सवाल

जेवणाचे हे फोटो आता मी अजून पाहू शकत नाही. त्याच्या या प्रतिक्रियेवर श्रेयाने आणखी एक स्वादिष्ठ थाळीचा फोटो इन्स्टावर टाकला आहे. स्वप्निला उत्तर देताना ती म्हणते, नका ना अस करु !

Web Title: Chala Hawa Yeu Dya Shreya Bugade Share Photos Swapnil Joshi Reaction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..