Chanakya: महाराष्ट्राच्या राजकारणातील 'चाणक्य' आता रुपेरी पडद्यावर.. पोस्टर पाहाच!

महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा थरार ‘चाणक्य’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Chanakya new marathi movie coming soon based on maharashtra politics
Chanakya new marathi movie coming soon based on maharashtra politics sakal
Updated on

Chanakya Marathi movie : गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने देशाचेच नव्हे तर अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्रात झालेला सत्ताबदल, राजकीय खेळी, पक्षांमधील फुट, डावपेच, राडे आपण सर्वांनीच पाहिले. अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणाची घडी सुरळीत झालेली नाही. पण या राजकरणावर चित्रपट, वेब सिरिज तयार करण्यासाठी अनेक दिग्दर्शक, निर्माते सज्ज झाले आहेत. अशाच एका चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. (Chanakya new marathi movie coming soon based on maharashtra politics )

महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा थरार आता आगामी ‘चाणक्य’ (Chanakya) या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता निलेश नवलाखा याने चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करत असून, 2023मध्ये हा प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचे पोस्ट लॉंच करण्यात आले आहे.

नवलाखा आर्ट्स मीडिया अँड एंटरटेनमेंटच्या माध्यमातून निलेश नवलाखा यांनी ‘शाळा’, ‘अनुमती’ आणि ‘फँड्री’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच त्यांनी निर्मिती केलेल्या ‘राक्षस’ या चित्रपटाचंही बरच कौतुक झालं होतं. ‘चाणक्य’ या चित्रपटाद्वारे निलेश नवलाखा दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामुळे उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाची आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी आखलेल्या कट-कारस्थानाची, तसेच शह-काटशह, राजकीय सूडनाट्‌य आणि गद्दारीची गोष्ट ‘चाणक्य’ प्रेक्षकांना सांगणार आहे.

या चित्रपटाचं पोस्टर सध्या बरंच चर्चेत आहे, 'सभेसाठी जमलेल्या प्रचंड मोठ्या जनसमुदायासमोर भाषण करणारा नेता आणि त्याच्या पाठीवर झालेला वार' हे दृश्य पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील घडलेलं राजकीय नाट्य या चित्रपटातून उलगडणार हे निश्चित. ‘चाणक्य’ चित्रपटाविषयी लेखक, दिग्दर्शक, निर्माता नीलेश नवलाखा म्हणाले, की ‘चाणक्य’ या चित्रपटातून अत्यंत टोकदार राजकीय कथा मांडली जाणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा चरित्रपट असेल. सत्तेसाठी सामान्यांच्या स्वप्नांचे बळी देऊन राज्य करणाऱ्या धुरंधरांची कथा मांडली जाणार आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com