अभिनेत्री म्हणाली, चांद्रयानाऐवजी भारताने शौचालयेच बांधावीत

वृत्तसंस्था
रविवार, 8 सप्टेंबर 2019

इस्त्राेच्या या प्रयत्नाचे संपूर्ण जगभरातून कौतुक करण्यात आले. परंतु पाकिस्तानी अभिनेत्री विणा मलिक हिने भारताच्या चांद्रयान मोहिमेची खिल्ली उडवली आहे.

लाहेर : भारत सध्या सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहे. वैज्ञानिक बाबींमध्ये देखील आपण मोठा विकास करत आहोत. जवळपास दीड महिन्यापूर्वी २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून झेपावलेले “चांद्रयान-२” अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. मात्र, केवळ २ किलोमीटरवर काही तांत्रिक कारणामुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला. वैज्ञानिकांचा हा महत्वाकांक्षी प्रयोग थोडक्यासाठी अपयशी ठरला, त्यामुळे भारतीयांचा काहीसा हिरमोड झाला खरा, परंतु इस्त्राेच्या या प्रयत्नाचे संपूर्ण जगभरातून कौतुक करण्यात आले. परंतु पाकिस्तानी अभिनेत्री विणा मलिक हिने भारताच्या चांद्रयान मोहिमेची खिल्ली उडवली आहे.

विणा मलिक हिने एका मागून एक सलग तीन ट्विट करत भारतीय वैज्ञानिकांची खिल्ली उडवली आहे. यातील एक ट्विटमध्ये तर तिने चक्क “चांद्रयान मोहिमेऐवजी भारताने शौचालयेच बांधावीत”, अशी संतापजनक प्रतिक्रीया दिली आहे. अर्थात या प्रतिक्रीयेवर भारतीय नेटकऱ्यांनीही तिचा चांगलाच समाचार घेतला आहे. तिने पुढे असेही म्हटले आहे की, हे मिशन आयएसआयने फेल केले आहे. अशा प्रकारच्या काहीही वल्गना तिने केल्या आहेत.

दरम्यान, चांद्रयान-२ मोहिमेच्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण देश क्षणांक्षणांचं अपडेट पहात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशाने रात्रभर जागून अनुभव घेतला. मात्र, विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटपर्यंत पोहोचले असताना संपर्क तुटला. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशातील जनतेच्या काळजाचा ठोका चुकला. यावेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला. तर अरविंद केजरीवाल, गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, अक्षय कुमार, अदनान सामी यांनीही ट्विट करत वैज्ञनिकांचं मनोधैर्य वाढवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrayaan 2 moon landing updates veena malik critisized mission