Amitabh Bachchan On Chandrayaan 3 : 'उस चांद के मिट्टी पर हमारे....!' अमिताभ यांची कविता वाचून येईल डोळ्यात पाणी!

देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी चांद्रयान ३ मोहिमेत सहभागी झालेल्या शास्त्रज्ञांची स्तूती केली आहे.
Chandrayaan 3 Mission Amitabh Bachchan Poem Viral Social media
Chandrayaan 3 Mission Amitabh Bachchan Poem Viral Social mediaesakal

Chandrayaan 3 Mission Amitabh Bachchan Poem Viral Social media : समस्त भारतीयांसाठी गौरवाची बाब म्हणजे आज चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होणार आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या कामगिरीचे केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून कौतुक होत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिलाच देश असणार आहे.

यासगळ्यात देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी चांद्रयान ३ मोहिमेत सहभागी झालेल्या शास्त्रज्ञांची स्तूती केली आहे. त्यांच्या परिश्रमांना धन्यवादही दिले आहे. त्यात बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी तर खास कविता करत इस्त्रो च्या शास्त्रज्ञांचा उत्साह वाढवला आहे. अमिताभ यांच्या या कवितेवर चाहत्यांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत

अमिताभ बच्चन हे आपल्या कवितेमध्ये म्हणतात की, भारताचं पाऊल आता चंद्रावर पडेल.. त्या चंद्राच्या मातीवर पहिलं पाऊल भारताचं असेल.....खऱ्या अर्थानं चांद्रयान आपल्या मामाच्या घरी पोहचणार आहे....आपल्या बालपणात सोबत करणारा चंद्र, प्रेमिकेचा लाडका चंद्र, व्रत वैकल्यं यांच्यासाठी महत्वाचा असणारा चंद्र हे सगळं आता आपल्यासाठी आणखी जवळ येणार आहे....याचं कारण म्हणजे आपण चंद्रावर जाणार आहोत...

अमिताभ याच्यापूर्वी प्रसिद्ध अभिनेता आर माधवननं देखील ट्विट करत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानं त्याच्या ट्विटमधून चांद्रयान मोहिमेतील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले होते. माधवननं नांबियार यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. काही झालं तरी भारताचं चांद्रयान ३ यशस्वी होणार मात्र यासगळ्यात या मोहिमेत महत्वाचे योगदान असलेल्या नांबियार यांना विसरुन चालणार नाही.असेही म्हटले होते.

माधवननं नांबियार यांची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेचं चाहत्यांनी कौतुकही केले होते. सध्या माधवनच्या प्रतिक्रियेनं नांबियार यांच्याविषयीच्या घटनांना उजाळा देण्याचे काम अभिनेत्यानं केले आहे. माधवन त्या ट्विटमध्ये म्हणतो की, चांद्रयान ३ साठी विकास इंजिन बनवणाऱ्या नांबियार यांचे स्वागत. त्यांना खूप खूप धन्यवाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com