'विधू विनोद चोप्रांमुळे माझ्यावर आलेली आत्महत्या करण्याची वेळ', चेतन भगतचा आरोप

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 22 July 2020

लेखक चेतन भगत यांनी सुशांतच्या आगामी सिनेमासंदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटला विधू विनोद चोप्रा यांच्या पत्नीने उत्तर दिलं आहे. त्यामुळे चेतन यांचा संताप अनावर होऊन त्यांनी असं काही ट्विट केलंय ज्यामुळे त्यांचं ट्विट व्हायरल होत आहे.

मुंबई- बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे मनोरंजन विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये अनेक विषयांवर वाद होत आहेत. सुशांतच्या आत्महत्येला १ महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. मात्र आजही लोकांच्या तोंडावर सुशांतचं नाव आहेच. नुकतंच लेखक चेतन भगत यांनी सुशांतच्या आगामी सिनेमासंदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटला विधू विनोद चोप्रा यांच्या पत्नीने उत्तर दिलं आहे. त्यामुळे चेतन यांचा संताप अनावर होऊन त्यांनी असं काही ट्विट केलंय ज्यामुळे त्यांचं ट्विट व्हायरल होत आहे.

हे ही वाचा: सुशांत आत्महत्या प्रकरणात आता होणार कंगना रनौतची चौकशी...

सुशांत सिंह राजपूतचा 'दिल बेचारा' हा सिनेमा लवकरंच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. सिनेमा आणि सुशांतचं समर्थन करत चेतन भगतने ट्विट करत समीक्षकांना सल्ला दिला आहे की सिनेमाबद्दल काहीही लिहिताना अतिहुशारपणा न दाखवत विचार करुन लिहा. बस्स. त्यांच्या या ट्विटमुळे ट्विटवर आता वाद सुरु झाला आहे.चेतन भगत यांच्या या ट्विटवर विधू विनोद चोप्रा यांची पत्नी अनुपमा चोप्रा यांनी चेतन यांना उत्तर देत म्हटलं आहे, 'जेव्हा तुम्ही विचार करता की माणसाचे विचार यापेक्षा खालच्या स्तरावर जाणार नाहीत तेव्हा नेमकं उलटं घडतं.'

अनुपमा यांच्या या ट्विटवर चेतन भगत चांगलेच संतापले. त्यांनी अनुपमा यांना उत्तर देत म्हटलं की, 'मॅडम, तुमच्या पतीने सगळ्यांसमोर मला धमकावलं होतं आणि निर्लज्जपणे माझं सगळं क्रेडिट खाऊन टाकलं होतं.चेतन पुढे लिहितात की, मी विचारल्यानंतरही मला '३ इडियट्स' या सिनेमात क्रेडिट द्यायला नकार दिला आणि मला आत्महत्या करण्यासाठी मजबूर केलं होतं. तेव्हा तुम्ही केवळ तमाशा पाहत होतात. तेव्हा तुमच्या विचारांचा स्तर कुठे गेला होता?'

चेतन यांचं हे ट्विट खूप व्हायरल होत आहे.  याआधी देखील चेतन यांनी सिने समीक्षकांला सल्ला देणारं ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी शेवटला असं देखील म्हटलं होतं की आधीच तुम्ही उलटसुलट लिहून अनेकांची आयुष्य उद्धस्त केली आहेत. आता थांबा आम्ही लोक बघत आहोत.

chetan bhagat claims vidhu vinod chopra drove me close to suicide  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chetan bhagat claims vidhu vinod chopra drove me close to suicide