esakal | रामदेव बाबांच्या 'कोरोनिल'वर टीका करणारा चेतन भगत ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

Chetan Bhagat

रामदेव बाबांच्या 'कोरोनिल'वर टीका करणारा चेतन भगत ट्रोल

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कोविड-१९ वरील उपचारासाठी रामदेव बाबांच्या Ramdev Baba पतंजली Patanjali या संस्थेकडून 'कोरोनिल' Coronil हे औषध २३ जून रोजी लाँच करण्यात आलं. कोरोनावर हे औषध उपयोगी आहे की नाही हे अद्यापपर्यंत सिद्ध झालेलं नाही. मात्र आता लेखक चेतन भगत Chetan Bhagat यांनी त्या औषधावरून ट्विट केल्याने ट्रोल झाले आहेत. 'खरंच गमतीशीर आहे हे, मी अजूनपर्यंत एकही ट्विट पाहिलं नाही, ज्यात कोरोनिलची तातडीने गरज आहे असं म्हटलंय', असं ट्विट चेतन भगत यांनी केलं. या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्यांचीच शाळा घेतली आहे. (chetan bhagat trolled after he tweeted about ramdev babas coronil medicine)

कोरोनिलवर टीका करणाऱ्या चेतन भगत यांच्या पुस्तकांवरून नेटकऱ्यांनी त्यांना टोला लगावला आहे. 'कोरोनिलचं सोड पण कोणी तुझी पुस्तकं तरी मागितली आहेत का', असा उपरोधिक सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. तर काहींनी इतरांवर टीका करण्यापेक्षा गरजूंची मदत कर, असा सल्ला भगत यांना दिला आहे. 'हे तर अजूनही मजेशीर आहे, मी एकही ट्विट पाहिलं नाही, ज्यात म्हटलंय की चेतन भगतचं पुस्तक वाचतोय', अशा शब्दांत नेटकऱ्याने त्यांना डिवचलं.

हेही वाचा : असं आहे आदर पुनावालांचं मलायका, करिनासोबतचं कनेक्शन

'कोरोनिल'च्या विक्रीतून २४१ कोटींची कमाई

रामदेव बाबा यांच्या पतंजलीने अवघ्या ४ महिन्यांत ८५ लाखांहून अधिक कोरोनिल किटची विक्री केली आहे. कंपनीच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत औषधांच्या विक्रीतून सुमारे २४१ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. कंपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 18 ऑक्टोबर ते 23 जून दरम्यान एकूण 23.54 लाख कोरोनिल किटची विक्री झाली आहे.