Satyashodhak Movie: छगन भुजबळ यांच्या हस्ते महात्मा फुलेंच्या आयुष्यावर आधारीत सत्यशोधक सिनेमाचं पोस्टर अनावरण

छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्यशोधक सिनेमाचं पोस्टर अनावरण करण्यात आलंय
chhagan bhujbal launch satyashodhak marathi movie poster based on mahatma phule life
chhagan bhujbal launch satyashodhak marathi movie poster based on mahatma phule lifeSAKAL

Satyashodhak Marathi Movie News: सध्या अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांचं प्रेम मिळवत आहेत. या वर्षात वेड, वाळवी, महाराष्ट्र शाहीर, बाईपण भारी देवा अशा सिनेमांनी चांगला गल्ला जमवला. याशिवाय प्रेक्षकांचं प्रेमही मिळवलं.

नुकताच रिलीज झालेला सुभेदार सिनेमा सुद्धा चांगलाच गाजतोय. अशातच आणखी एका आगामी सिनेमाची घोषणा झालीय. हा सिनेमा म्हणजे सत्यशोधक. महात्मा फुलेंच्या जीवनकार्यावर आधारीत सत्यशोधक सिनेमाचं पोस्टर अनावरण छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलंय.

(chhagan bhujbal launch satyashodhak marathi movie poster)

chhagan bhujbal launch satyashodhak marathi movie poster based on mahatma phule life
OMG 2 नंतर अक्षय कुमारच्या या गाजलेल्या सिनेमाचा सिक्वेल येणार? अनुपम खेरने केला इशारा

छगन भुजबळ यांच्या हस्ते पोस्टर लॉंच

समता फिल्मस् निर्मित आणि अभिता फिल्म्स प्रस्तुत क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आगामी "सत्यशोधक" चित्रपटाच्या पोस्टर अनावरण नुकतेच झाले. यावेळी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक येथील कार्यालयात करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, दिलिप खैरे, समता फिल्मस् चे निर्माते आप्पा बोराटे, प्रवीण तायडे, लेखक आणि दिगदर्शक निलेश जळमकर , कार्यकारी निर्माता शिवा बागुल, माळी महासंघाचे प्रमुख बाजीराव अण्णा तिडके,

समता परिषदेचे प्रमुख रवी सोनवणे साहेब, सत्यशोधक राजेंद्र बागुल, अभिनेते रोहित सरवार, आदित्य कमोदकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, सुनील पैठणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

काय असणार सत्यशोधक सिनेमाची कथा?

यावेळी "सत्यशोधक" चित्रपटाचा ट्रेलर छगन भुजबळ यांना दाखविण्यात आला व लवकरच हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली. मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यशोधक चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या सर्व टीमला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

समता फिल्मस् निर्मित "सत्यशोधक" मराठी चित्रपटासाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान, आधुनिक उपकरणे आणि अद्ययावत व्हीएफएक्सचा वापर करण्यात आलेला आहे.

या चित्रपटात महात्मा जोतीराव फुलेंनी समाज परिवर्तनासाठी केलेला संघर्ष, आधुनिक महाराष्ट्राच्या विकास, कामगार चळवळ, महिलांचा शैक्षणिक विकास,

आधुनिक इमारतींची बांधणी या सर्वांमध्ये केलेली भरीव कामगिरी तसेच त्यांना या सर्व प्रसंगात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी दिलेली साथ आणि त्यांनी आयुष्यभर केलेले समाजप्रबोधन हे सर्व पैलू चित्रपटात अत्यंत काळानुरूप दाखविण्यात आले आहे.

हे मराठी कलाकार ज्योतिबा - सावित्रीबाई फुलेंची भुमिका साकारणार

सत्यशोधक चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राज्य पुरस्कार विजेते दिग्दर्शक नीलेश जळमकर यांनी केले आहे. चित्रपटात महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप कुलकर्णी यांनी साकारली आहे तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राजश्री देशपांडे सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आहेत.

याशिवाय रवींद्र मंकणी, रवी पटवर्धन, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा या दमदार कलाकारांची त्यांना लाभली आहेत. या चित्रपटाची पटकथा तयार करण्यासाठी राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा संदर्भ घेण्यात आला आहे.

याशिवाय महात्मा जोतीराव फुलेंचे गाढे अभ्यासक माननीय साहित्यिक प्रा.हरी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक अमितराज यांचे संगीत लाभले असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते समीर फातर्फेकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. "सत्यशोधक" लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com