Chhatrapati Sambhaji: अनेक वर्ष रखडलेल्या 'छत्रपती संभाजी' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, या तारखेला होणार रिलीज

'छत्रपती संभाजी' सिनेमात हा अभिनेता छत्रपती संभाजी यांची भूमिका साकारतोय
chhatrapati sambhaji marathi movie released on 26 january 2024
chhatrapati sambhaji marathi movie released on 26 january 2024 SAKAL

Chhatrapati Sambhaji News: गेल्या अनेक वर्षांपासुन छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रदर्शनावर आधारित छत्रपती संभाजी सिनेमा रखडला होता. पण आता छत्रपती संभाजी सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा आलाय.

स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिजवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे रणांगणावरचे अस्सल शेर होते. याच स्वराज्याच्या लढवय्यावर आधारित छत्रपती संभाजी सिनेमा अखेर रिलीज होणार आहे.

chhatrapati sambhaji marathi movie released on 26 january 2024
Thaina Fields: धक्कादायक ! पॉर्नइंडस्ट्रीमधील फसवणुकीचा पर्दाफाश करणाऱ्या अ‍ॅडल्ट स्टारचा २४ व्या वर्षी मृत्यू

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी म्हणजे बलिदान भूमी वडू बुद्रुक, पुणे येथे या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवले आणि वाढविले.

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्याचा विस्तार केला.

हिंदवी स्वराज्य निर्माण करणं हे सहज शक्य नव्हतं, पण त्याहून कठीण होतं ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं, वाढवणं. छत्रपती संभाजी महाराजांनी हे आव्हान स्वीकारलं आणि सक्षमपणे पेललं सुद्धा.

अद्वितीय राजकरण, आक्रमक रणनीती आणि रणकौशल्याच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलेला प्रेरणादायी इतिहास 'छत्रपती संभाजी' या चित्रपटातून तरुण पिढीला पाहता येणार आहे.

प्रमोद पवार, शशांक उदापूरकर,रजित कपूर, दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख , कै. आनंद अभ्यंकर,समीर,मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार 'छत्रपती संभाजी' चित्रपटात आहेत.

शशांक उदापूरकर छत्रपती संभाजींची भूमिका साकारत आहेत.

'छत्रपती संभाजी' चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा सुरेश चिखले यांची आहे. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिले आहे. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत.

राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित 'छत्रपती संभाजी' हा मराठी चित्रपट येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी आपल्या भेटीला येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com