esakal | 'चीकू की मम्मी दूर की' मध्ये मिथूनदांची हटके स्टाईल
sakal

बोलून बातमी शोधा

'चीकू की मम्मी दूर की' मध्ये मिथूनदांची हटके स्टाईल

'चीकू की मम्मी दूर की' मध्ये मिथूनदांची हटके स्टाईल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या गप्पा रंगताना दिसताहेत. प्रसिद्ध अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी आता मालिकेतून प्रेक्षकांसमोर यायचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'चीकू की मम्मी दूर की' या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून, चाहते स्टार प्लसच्या या नवीन मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेच्या प्रोमोनं मालिकेबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मिथून यांच्याबाबत सांगायचं झाल्यास, मिथुन चक्रवर्ती, जे नुकतेच 'चीकू की मम्मी दूर की' च्या नव्या प्रोमोमध्ये दिसले आणि त्यांच्या सहभागाने त्यांनी आपल्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केले होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “प्रोमोची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या रोलर-कोस्टर प्रवासाच्या फ्लॅशबॅकची आठवण झाली. ते चीकूशी खूप भावनिकपणे जोडले गेले असल्याचे त्यांना जाणवले आणि याच वैयक्तिक कारणास्तव त्यांनी या प्रोमोसाठी आपल्या मानधनात कपात करण्याचा निर्णय घेतला. मिथुन सर हे नेहमी वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी ओळखले जातात. या दिग्गज अभिनेत्यानं या मालिकेच्या प्रोमोचा भाग होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची इच्छाशक्ती. मिथुन दांच्या स्ट्रगलप्रमाणेच मेहनत आणि यश मिळवण्याची इच्छा असलेल्या चीकूच्या संघर्षमय प्रवासाचं वर्णन या मालिकेत आहे.

मिथून यांच्याबाबत सांगायचं झाल्यास, ते नेहमी आपल्या प्रोजेक्टमध्ये बिझी असतात. त्यांना एखादी फिल्म किंवा मालिका आवडल्यास ते त्याच्याशी भावनात्मकदृष्ट्या जोडले जातात. यामुळे त्यांच्या फॅन फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे.

loading image
go to top