चिन्मय मांडलेकर बसलाय गाल फुगवून;फोटो शेअर करीत पत्नीने सांगितली गम्मत Chinmay Mandlekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chinmay mandlekar

चिन्मय मांडलेकर बसलाय गाल फुगवून;फोटो शेअर करीत पत्नीने सांगितली गम्मत

नाटक, मालिका, चित्रपट , वेब मालिका अशा चारही माध्यमात लीलया वावरणारा मराठतील एक दिग्गज मनाला जाणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर(Chinmay Mandlekar) कायमच महत्वाचे विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येतो. 'काश्मीर फाईल्स' या बहुचर्चित चित्रपटातील त्याचे कामही गाजते आहे. त्याच्या अतिरेक्याच्या भूमिकेवर प्रेक्षक चीड व्यक्त करत आलस्याने त्याची भूमिका पोहोचल्याचा आनंदही त्याने व्यक्त केला आहे. नुकताच 'पावनखिंड' चित्रपट येऊन गेला. या चित्रपटात त्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली. मग असे असताना अभिनेता चिन्मय मांडलेकर याने गाल फुगवण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न पडतो, याच प्रश्नाचे उत्तर त्याची पत्नी नेहा जोशी मांडलेकर हिने सोशल मीडियावर उघड केले आहे.

हेही वाचा: सिद्धार्थ-मितालीने दिली गुड न्यूज

यातून कलाकरांना यातून अनेकदा टीकेलाही सामोरे जावे लागले आहे. कधीकधी चाहत्यांकडून चुकीच्या, आक्षेपार्ह कमेंट मिळाल्याने वाद झाल्याचेही आढळून आले आहे. परंतु या सगळ्याकडे दुर्लक्ष करत बहुतांशी कलाकार आपल्या चाहत्यांसाठी समाज माध्यमाना भेट देत असतात. आपल्या चाहत्यांची बोलण्यासाठी, ऋणानुबंध निर्माण करण्यासाठी कलाकार सोशल मीडियाचा वापर करत असतात.

Chinmay Mandlekar 'Chatrapati shivaji Maharaj' in 'Pawankhind' And Bitta Karate in 'The Kashmir Files'.

Chinmay Mandlekar 'Chatrapati shivaji Maharaj' in 'Pawankhind' And Bitta Karate in 'The Kashmir Files'.

याच सोशल मीडियावर नेहा जोशी मांडलेकर हिने चिन्मय मांडलेकर गाल फुगवून बसल्याचे म्हंटले आहे. आता प्रश्न पडतो, नेमके गाल का फुगवले असतील? त्यांच्यात भांडण झाले असेल का? पण तसे काहीही नाही. तिने चक्क त्याच्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. कलाकार अनेकदा आपले लहानपणीचे फोटो शेअर करत असतात. या फोटोंना चाहत्यांचे प्रेमही मिळते. पण आज असा फोटो कलाकाराने नाही तर त्यांच्या पत्नीने शेअर केला आहे.

नेहा जोशी मांडलेकर(Neha Joshi Mandlekar) हिने इंस्टाग्राम वर चिन्मयचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये चिन्मय अत्यंत गोड दिसत असून गाल फुगवून बसला आहे. त्याच्यासोबत आणखी दोन मुलं असून ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीत हा फोटो आहे. चिन्मयच्या एका बाजूला गळ्यात ढोलकी अडकवलेला मुलगा तर दुसऱ्या बाजूला एक मुलगी बसली आहे. 'कोण आहे बरं हा मुलगा, आणि असे गालफुगवून का बरं बसला आहे' असे कॅप्शन नेहाने या फोटोला दिले आहे. सध्या हा फोटो चांगलाच चर्चेत आहे. नेहा जोशी मांडलेकर स्वतः फोटोग्राफर असून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मध्ये ती कार्यरत आहे.

Web Title: Chinmay Mandlekar Wife Says Who Is This Gappu Gaal Wala

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..