Chris Rock: 'ऑस्करमध्ये ॲकरिंग नको रे बाबा!' ख्रिस रॉकचा नकार

जगप्रसिद्ध ऑस्कर सोहळ्यात झालेल्या त्या प्रकारानं साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. 94 व्या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथनं निवेदक ख्रिसच्या कानशीलात लगावली होती.
Chris Rock news
Chris Rock news esakal

Oscar Show Chris Rock News: जगप्रसिद्ध ऑस्कर सोहळ्यात झालेल्या त्या प्रकारानं साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. 94 व्या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथनं निवेदक ख्रिसच्या कानशीलात लगावली होती. कारण होतं त्यानं विलच्या पत्नीची केलेली थट्टा. त्यावरुन संतापलेल्या विलनं साऱ्या (Hollywood News) प्रेक्षकांसमोर ख्रिसला फटकारलं, शिवीगाळ केली. त्यानंतर सोशल मीडियावरुन विलच्या त्या कृतीचा निषेध करण्यात आला होता. त्याच्यावर (Social Media viral news) आता ऑस्कर समितीनं सोहळ्यात सहभागी होण्यावर बंदीही घातली आहे. यासगळ्यात ख्रिसनं एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याला आगामी ऑस्कर सोहळ्यात निवेदन करणार का अशी विचारणा करण्यात आली होती.

साधारण पाच महिन्यांपूर्वी झालेल्या त्या ऑस्कर सोहळ्यानं मनोरंजन जगतात खळबळ उडाली होती. विलच्या रागाचा पारा चढला. त्यानं ख्रिसच्या श्रीमुखात लगावली. कालांतरानं त्याला आपल्या कृतीचा चांगलाच पश्चाताप झाला. चाहत्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानं ख्रिसच्या घरच्यांची माफीही मागितली. ख्रिसची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. ऑस्करच्या समितीला देखील पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र ऑस्कर समितीनं आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा विचार केला आहे.

यासगळ्यात ख्रिसनं आपण ऑस्करच्या सोहळयाचे होस्टिंग करण्यास नकार कळवला आहे. त्याच्या या निर्णयानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याला अँकरिंग करण्यास आग्रह केला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्या प्रसंगानंतर ख्रिसला धक्का बसला होता. एका कॉमेडी शोमध्ये झालेल्या ख्रिसनं याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यात सहभागी झालेल्या प्रेक्षकांना तो म्हणाला, मला पुढील वर्षी ऑस्करच्या सोहळ्याचे अँकरिंग करणार का अशी विचारणा करण्यात आली होती. मात्र मी त्यांना नकार कळवला आहे. त्या रात्री जे झालं हे मी कधीही विसरु शकणार नाही. असं ख्रिसनं म्हटलं आहे.

Chris Rock news
जर 'विक्रम वेधा' हिट झाला तर मी....KRK नं दिलं हृतिकला खुलं आव्हान

दुसरीकडे ऑस्कर समितीनं विलवर मोठी कारवाई केली आहे. थप्पड प्रकरणानंतर अकदमीनं जो बंदीचा निर्णय त्याला शिक्षा म्हणून सुनावली आहे, त्यानुसार विल स्मिथ यापुढील १० वर्षांसाठी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहू शकत नाही. म्हणजे पुढील सोहळ्यात जरी त्याला नॉमिनेशन मिळाले,तो जिंकला तरी त्याला स्वतःला तो पुरस्कार मानानं मंचावर जात स्विकारता येणार नाही.

Chris Rock news
KRK : केआरकेचा आमिर खानवरून शाहरुख-सलमानवर हल्ला; दिला इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com