शास्त्रीय गायिका डॉ.प्रभा अत्रे यांना पद्मविभुषण, सुलोचना चव्हाण पद्मश्रीच्या मानकरी | Classical Singer Dr Prabha Atre padmavibushan sulochana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dr pabha atre and singer sulochana chavan
शास्त्रीय गायिका डॉ.प्रभा अत्रे यांना पद्मविभुषण, सुलोचना चव्हाण पद्मश्रीच्या मानकरी

शास्त्रीय गायिका डॉ.प्रभा अत्रे यांना पद्मविभुषण, सुलोचना चव्हाण पद्मश्रीच्या मानकरी

Republic day 2022: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कार्थींची नावं जाहीर झाली आहेत. यामध्ये आपल्या शास्त्रीय गायनानं जगभरातील श्रोत्यांना स्वरानंद देणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ.प्रभा अत्रे (Dr.Prabha Atre) यांना पद्मविभुषण पुरस्कार जाहिर झाला आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ गायिका सुलोचना दीदी (Sulochana Chavan) आणि प्रसिद्ध गायक सोनु निगम (Soun Niagm) यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

देशातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना या सर्वोच्च पुरस्कारानं गौरविण्यात येते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण , ज्येष्ठ गायिका डॉ.प्रभा अत्रे आणि प्रसिद्ध गायक सोनु निगम यांना देशातील मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.

Web Title: Classical Singer Dr Prabha Atre Padmavibushan Sulochana Chavan Song Nigam Padma Shree

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..