कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; सुत्रांची माहिती

Raju Srivastava
Raju Srivastava sakal
Updated on

नवी दिल्ली : हास्य अभिनेते राजू श्रीवास्तव यांची प्रकृती नाजूक असून ते अजुनही दिल्लीच्या एम्समध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करताना त्यांच्या छातीत दुखू लागले होते. त्याचवेळी ते जमिनीवर कोसळले होते. त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. (Comedian Raju Srivastava continues to be in a critical stage)

Raju Srivastava
Laal Singh Chaddha आणि मिलिंद सोमणचा न्यूड फोटो, समोर आलं मोठं कनेक्शन,वाचा

तत्पूर्वी राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबातील रजत श्रीवास्तव यांनी म्हटलं होत की, राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत पहिल्यापेक्षा अधिक सुधारणा झालेली दिसून येत आहे. दोन दिवसांनंतर ट्यूबच्या सहाय्यानं त्यांना दूध दिल्याचं देखील कुटुंबीयांनी म्हटलं होतं. कानपूरमध्ये राजू श्रीवास्तव ज्या विभागात राहातात तिथे सगळे लोक त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत अशी देखील माहिती रजत श्रीवास्तव यांनी दिली. राजू लवकरात लवकर बरा होऊन कानपूरला यावा अशी सगळ्यांची मनोकामना असल्याचं देखील ते म्हणाले.

तत्पूर्वी राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबातील रजत श्रीवास्तव यांनी म्हटलं होत की, राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत पहिल्यापेक्षा अधिक सुधारणा झालेली दिसून येत आहे. दोन दिवसांनंतर ट्यूबच्या सहाय्यानं त्यांना दूध दिल्याचं देखील कुटुंबीयांनी म्हटलं होतं. कानपूरमध्ये राजू श्रीवास्तव ज्या विभागात राहातात तिथे सगळे लोक त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत अशी देखील माहिती रजत श्रीवास्तव यांनी दिली. राजू लवकरात लवकर बरा होऊन कानपूरला यावा अशी सगळ्यांची मनोकामना असल्याचं देखील ते म्हणाले

बीजेपी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील फोन करुन राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांची विचारपूस केली होती. बीजेपी महामंत्री सुनिल बंसल यांनी देखील एम्स रुग्णालयात जाऊन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com