esakal | ड्रग्जच्या गेला आहारी, नको त्या अवस्थेत सापडला सिद्धार्थ सागर
sakal

बोलून बातमी शोधा

ड्रग्जच्या गेला आहारी, नको त्या अवस्थेत सापडला सिद्धार्थ सागर

ड्रग्जच्या गेला आहारी, नको त्या अवस्थेत सापडला सिद्धार्थ सागर

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन क्षेत्रातील अनेक धक्कादायक घडामोडी समोर येताना दिसत आहेत. महिन्यापूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करणे आणि शेयर करणे याप्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील काही सेलिब्रेटींवर अंमलीपदार्थ विरोधी पथकानं कारवाई केल्याचे समोर आले आहे. अभिनेता गौरव देसाई आणखी काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं. तर आज सिद्धार्थ नावाच्या एका अभिनेत्याला पोलिसांनी रिहॅबिटीलायझेशन सेंटरमध्ये दाखल केलं आहे. त्याच्या निमित्तानं आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

कॉमेडी सर्कस मधील प्रख्यात कॉमेडियन सिद्धार्थ सागर पोलिसांना नको त्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला. सध्या त्याला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला बायपोलर डिसऑर्डर नावाचा मानसिक आजार झाल्याचे सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ हा त्याच्या शुटींग साईटवरुन अचानक गायब झाला होता. २०१८ मध्ये तो ड्रग्स घेतल्याच्या प्रकरणावरुन चर्चेत आला होता. त्यावेळी सिद्धार्थनं एक धक्कादायक खुलासा केला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. तो खुलासा असा की, त्याचे घरचेच त्याला ड्रग्ज देत होते. त्यानंतर काही काळानं त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले होते. मात्र आता पुन्हा तो एकदा चर्चेत आला आहे. सध्या तो एका कॉमेडी शो मध्ये काम करत आहे. त्याची परिक्षक प्रसिद्ध निर्माती आणि दिग्दर्शिका फराह खान आहे. जेव्हा सिद्धार्थ हा त्याच्या शुटींग साईटवरुन गायब झाला तेव्हा तो पोलिसांना वेगळ्या अवस्थेत सापडल्याचे दिसून आले. त्याच्या कुटूंबियांना पोलिसांनी फोन करुन याबाबत माहिती दिली होती. तेव्हा त्याचे कुटूंबीय दिल्लीमध्ये होते.

याप्रकरणी सिद्धार्थच्या कुटूंबियांनी सांगितले की, जेव्हा आम्हाला पोलिसांनी फोन करुन सिद्धार्थविषयी माहिती दिली तेव्हा धक्का बसला. त्याची प्रकृती फारच खराब झाली होती. त्याला केवळ आमचा मोबाईल क्रमांक लक्षात होता. त्यानं आम्हाला फोन केला. आणि आम्ही त्याला पुन्हा शुटींगला जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यानं ते काही ऐकलं नाही. वाईट या गोष्टीचे वाटते की, त्याच्यावर अशी वेळ आल्यानंतर त्याच्या एकाही मित्रानं त्याला साथ दिली नाही. त्याला या समस्येतून बाहेर काढण्यासाठी कुणीही मदत केलेली नाही.

loading image
go to top