ट्विटरवर भाईला नेटकऱ्यांकडून शुभेच्छा

अशोक मुरुमकर
Thursday, 24 September 2020

अभिनेता सलमान खानची बॉलिवूडमध्ये भाईजान म्हणून ओळख आहे. त्याचे अनेक  चाहते प्रेमाने त्याला भाई म्हणूनच हाक मारतात.

अहमदनगर : अभिनेता सलमान खानची बॉलिवूडमध्ये भाईजान म्हणून ओळख आहे. त्याचे अनेक  चाहते प्रेमाने त्याला भाई म्हणूनच हाक मारतात. सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशी २७ डिसेंबरला दरवर्षी ‘Happy Birthday Bhai’ हा ट्रेण्ड ट्विटरवर पाहायला मिळतो. मात्र आज म्हणजेच २४ सप्टेंबरलाच ट्विटरवर ‘Happy Birthday Bhai’ ट्रेण्ड दिसला आहे. यावर हजारोने ट्विट्स पडले आहेत. मात्र अचानक नेटकरी कोणत्या भाईला शुभेच्छा देत आहेत असा प्रश्नही यामुळे निर्माण झाला आहे. 

ट्विटरवर अचानक ‘Happy Birthday Bhai’ का ट्रेण्ड होत आहे. अनेकजण Happy Birthday Bhai का ट्रेण्ड होत आहे हे विचारण्यासाठी हे शब्द वापरुन ट्विट करत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे काही जणांनी या ट्रेण्डमध्ये भाजपाचे दिल्लीमधील नेते व प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

बग्गा यांनी २०१९ मध्ये दिल्लीमधून विधानसभा निवडणूकही लढवली होती. अनेकदा सोशल नेटवर्किंगवर भाजपाच्या समर्थानर्थ हॅशटॅग ट्रेण्ड करण्यासाठी नेटकऱ्यांमध्ये बग्गा ओळखले जातात. बग्गा हे ट्विटरवर अत्यंत सक्रीय आहेत. त्यांनी दीपिकाच्या छपाक या चित्रपटाच्या विरोधात आवाज उठला होता. तसेच या चित्रपटाऐवजी त्याच कालावधीत प्रदार्शित झालेल्या तान्हाजी चित्रपटाला जाण्याचे आवाहन त्यांनी ट्विटवरुन केलं होतं.

मात्र बग्गा यांना शुभेच्छा देण्याबरोबरच अनेकजण Happy Birthday Bhai हा टॉपिक आपल्या ओळखीच्या लोकांना तसेच जवळच्या मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी वापरत असल्याचे दिसत आहे. एकंदरितच हा टॉपिक ट्रेंडिंग असला तरी अनेकजण या टॉपिकमुळे बुचकाळ्यात पडले आहेत. काहींनी तर या विषयावर का बोलताय हे विचारण्यासाठी लोकं या तीन शब्दांचा वापर करत असल्यानेच हे शब्द ट्रेण्डमध्ये आल्याचे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congratulations to the bhai on Twitter from netizens