'अभिनंदन भारत...'रियाच्या वडीलांच्या नावे संदेश व्हायरल'

टीम ई सकाळ
Sunday, 6 September 2020

'अभिनंदन भारत' असं म्हणत वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांनी या अटकेबाबत आपलं मौन सोडल्याचे दिसून येत आहे.

मुंबई : चित्रपटसृष्टीशी निगडीत व्यक्तींना अंमली पदार्थ पुरवत असल्याच्या संशयावरुन रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला अटक झाल्यानंतर त्याच्या वडीलांची पहिल्यांदाच प्रतिक्रीया समोर आली आहे. 'अभिनंदन भारत' असं म्हणत वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांनी या अटकेबाबत आपलं मौन सोडल्याचे दिसून येत आहे. सोशल मिडीयावर त्यांच्या नावे एक संदेश व्हायरल झाला आहे. मात्र, इंद्रजित चक्रवर्ती यांनी याला दुजोरा दिलेला नाही. असे असलं तरी हा संदेश ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. 

इंद्रजित चक्रवर्ती यांच्या नावे व्हायरल झालेल्या या संदेशात म्हटलं आहे की, "भारताचे अभिनंदन, आता तुम्ही माझ्या मुलाला अटक केली असून यानंतर माझ्या मुलीलाही अटक कराल याची मला खात्री आहे. त्यानंतर कोणाला कराल ते ठाऊक नाही पण तुम्ही अत्यंत प्रभावीपणे एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाला उध्वस्त केलं आहे. पण असो, न्यायासाठी सर्वकाही न्याय्य आहे. जय हिंद." या संदेशाखाली लेफ्टनंट कर्नल इंद्रजीत चक्रवर्ती आणि कंसात निवृत्त असं लिहिलं आहे. सुशांत सिंग राजपुत मृत्यूप्रकरणी ड्रग्ज कनेक्शन उघड झाले असून अंमली पदार्थविरोधी पथक याचा अधिक तपास करत आहे. यासंदर्भात रियाला एनसीबी कार्यालयात आज सकाळी 11 वाजता हजर राहण्यासाठी समन्स बजावला गेला होता. शोविकनंतर रिया चक्रवर्तीलाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congratulations India says rhea father in a virul messege

टॉपिकस
Topic Tags: