Bigg Boss 17: पाकिस्तानची सीमा सलमानच्या बिग बॉसमध्ये! म्हणाली, "मला तर कपिल शर्मानं.."

Seema Haider On Participating In Bigg Boss 17:
Seema Haider On Participating In Bigg Boss 17:Esakal
Updated on

Seema Haider On Participating In Bigg Boss 17: गेल्या काही दिवासांपुर्वीच बिग बॉस ओटीटीचा दिसरा सिझन संपला. यंदाचा ओटीटीचा सिझनही चांगलाच गाजला. एल्विश यादवने या सिझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं तर अभिषेक मल्हान हा उप विजेता ठरला. आता टिव्हीवरील सर्वात विवादित शो आणि तितकाच लोकप्रिय असलेला बिग बॉसचा यंदा 17 वा सिझन सुरु होणार आहे.

Seema Haider On Participating In Bigg Boss 17:
Sameer Wankhede : 'पण मी कुणाच्या बापाला....' समीर वानखेडेंचं शाहरुखला सणसणीत उत्तर

बिग बॉसच्या नवीन सीझन 17 साठी कोणकोणते कलाकार घरात बंद होतील त्यांच्या नावाच्या चर्चा सुरु आहेत. बिग बॉसचे निर्माते या शोसाठी निवडक स्पर्धक आणतात ज्यांचे बाहेर काही ना काही वाद झालेले असतात. आता त्यातच अनेक कलाकारांच्या नावाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. त्यात सर्वात चर्चेतलं नाव म्हणजे पाकिस्तानातुन आपल्या प्रियकरासाठी भारतात आलेली सीमा हैदर.

Seema Haider On Participating In Bigg Boss 17:
Esha Deol : 'माझे पप्पा तर....' धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या 'किसिंग सीन'वर ईशा देओलची भन्नाट प्रतिक्रिया

सोशल मीडियावर पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर ही स्पर्धक म्हणुन भाग घेवु शकते असा दावा केला जात होता. याबद्दलच्या अनेक पोस्टही व्हायरल झाल्या होत्या. सीमा ही सचिनच्या प्रेमात पाकिस्तानातून भारतात आली. त्यानंतर ती खुपच चर्चेत आली.

जवळपास प्रत्येक मीडिया चॅनलने सीमा हैदरच्या बातम्या कव्हर केल्या. मात्र सीमा केवळ सलमान खानच्या बिग बॉसमध्येच नाही तर द कपिल शर्मा मध्ये देखील सहभागी होणार अशी रंगली होती. त्यात आता सीमा हैदरने स्वत: याबद्दल खुलासा केला.

सीमा हैदरने शेयर केलेल्या या व्हिडिओत सांगितले की, तिला कपिल शर्मा आणि सलमान खानच्या बिग बॉसमधुन देखील ऑफर मिळाली आली आहे. मात्र सध्या ती कोणत्याही शो मध्ये सहभागी होण्याचा विचार करत नाही आहे. जर तिने असं काही ठरवलं ही तर ती स्वतः याबद्दल सांगेल.

Seema Haider On Participating In Bigg Boss 17:
Scam 2003: एवढा मोठा घोटाळा की शून्य कमी पडतील, तेलगीनं देशाला हादरवून टाकलं, काय होता तो घोटाळा?

सिमाला कोणत्या शोची ऑफर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिला यापुर्वी देखील चित्रपटाची ऑफर आलेली आहे. तिला अभिनय करण्यासाठीही विचारणा झाली. त्याचबरोबर तिला राजकारणात येण्यासाठीही काही राजकिय पक्षांनी ऑफर दिल्या होत्या अशा चर्चा होत्या. सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमकहानी वर आता चित्रपट बनवण्यात येत आहे.

Seema Haider On Participating In Bigg Boss 17:
Kushi Twitter Review: सामंथा अन् विजयनं प्रेक्षकांना दिली खुप मोठी 'खुशी' नेटकरी म्हणताय,...

बिग बॉसच्या आगामी सीझनबद्दल बोलायचे झाले तर शोची थीम 'कपल्स वर्सेस सिंगल्स' अशी आहे. 17व्या सीझनमध्ये निर्माते 5 सिंगल आणि 4 जोडप्यांना एकत्र दिसणार आहे. ईशा सिंग, अभिषेक मल्हान, अरिजित तनेजा आणि साक्षी चोप्रा आणि अंकिता लोखंडे-विकी जैन, पंड्या स्टोर फेम कंवर ढिल्लॉन-अॅलिस कौशिक आणि गु नील यांच्या नावाची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com