'पाताल लोक'मुळे अनुष्का शर्माच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ, आता शिख समुदायांच्या भावना दुखावल्याचा आरोप

patal lok
patal lok

मुंबई- लॉकडाऊनमध्ये अनेकजण ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. सिनेमा, वेबसिरीज सारखे अनेक पर्याय यावर उपलब्ध असल्याने अनेकजण यावर मनोरंजनाचा आस्वाद घेत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील ओटीटी प्लॅटफॉर्मकडे येणारा प्रेक्षकांचा वाढता कल पाहता तिची 'पाताल लोक' ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आणली. अनुष्काने या वेबसिरिजच्या माध्यमातून निर्माती म्हणून डिजीटल विश्वात पदार्पण केलंय.  मात्र अनुष्का शर्माची पहिली निर्मिती असलेली वेबसिरीज 'पाताल लोक' रिलीज झाल्यापासूनंच वादात आहे. आणि यामुळे अनुष्का शर्माच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढंच होताना पाहायला मिळतेय.

काही दिवसांपूर्वीच वेब सिरीजवर शिख समुदायांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. पंजाबमधील एका वकिलाने शिख समुदायाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 'पाताल लोक' वेबसिरीजच्या निर्मात्यांवर आरोप केला गेला आहे की या सिरीजच्या तिस-या एपिसोडमध्ये शिख समुदायाची प्रतिमा खराब होताना दाखवली आहे. यामध्ये असं दाखवलं गेलं आहे की शिख समुदाय दलित आणि मागासलेल्या जातींचा छळ करत आहेत. याव्यतिरिक्त यामध्ये शिखांद्वारे महिलेचा छळ करत असल्याचंही दाखवण्यात आलं असल्याचा आरोप आहे. 

याआधीही 'पाताल लोक' या वेबसिरीजमधील काही दृश्यांद्वारे नेपाळी आणि ईशान्य लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप निर्मात्यांवर करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच भाजपा आमदार नंद किशोर गुर्जर यांनी देखील तक्रार दाखल केली होती. त्यांनी सांगितलं की, त्यांचा फोटो मॉर्फ्ड करुन ते एक अपराधी पात्र म्हणून दाखवण्यात आलं आहे तसंत गुर्जर जातीचा अपमान होईल अशा शब्दांचा वापर देखील यात केला आहे. मात्र असं असलं तरी यावर अजुन अनुष्काची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.    

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

From the underbelly comes a crime thriller that will change 

A post shared by ɐɯɹɐɥS ɐʞɥsnu∀ (@anushkasharma) on

controversy on paatal lok web series sikh community says it it is hurting their sentiments

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com